लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने रत्नागिरी पोलीस दलाचे पथ संचलन

रत्नागिरी : राज्यात सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या राजकीय घडामोडी तसेच आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने रत्नागिरी पोलीस दलामार्फत २४ एप्रिल रोजी दापोली, संगमेश्वर, लांजा व देवरूख या पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये पथ संचलन घेण्यात आले.
या पथ संचलनामध्ये त्रिपुरा राज्यातील S.A.P (State Armed Police), C.A.F (Central Armed Forces), तसेच रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचे RCP(Riot Control Police) प्लाटून व प्रत्येक उप विभागातील उप विभागीय पोलीस अधिकारी तसेच पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सहभाग घेतला. यामध्ये दापोलीत एकूण १३५, देवरूखमध्ये ११८, लांजा येथे १२०, तर संगमेश्वरमध्ये एकूण १३२ S.A.P, C.A.F, RCP प्लाटून आणि उप विभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी रत्नागिरी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरीता सर्व नागरिकांना जिल्हा पोलीस दलास सहकार्य करण्याचे तसेच दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे.




