मुख्य बातमीराजकीय

सात टप्प्यांत होणार निवडणूक

नवी दिल्ली : देशभरात सात टप्प्यात लोकसभा निवडणूक कार्यक्रम पार पडणार असून १९ एप्रिल २०२४ रोजी देशात पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात होईल. तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि २० मे अशा पाच टप्प्यात हे मतदान पार पडेल. त्यानंतर ४ जून २०२४ रोजी देशभरातील लोकसभा निवडणुकांचा निकाल एकत्रित जाहीर होईल
पहिला टप्पा (५ मतदारसंघ) १९ एप्रिल २०२४ – गडचिरोली, भंडारा-गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, रामटेक (एकूण ५). दुसरा टप्पा (८ मतदारसंघ) २६ एप्रिल २०२४ बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी (८). तिसरा टप्पा (११ मतदारसंघ) ७ मे २०२४ रायगड, बारामती, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले (एकूण ११). चौथा टप्पा (११ मतदारसंघ) १३ मे २०२४ अहमदनगर, शिर्डी, बीड, नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छ. संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर (एकूण ११). पाचवा टप्पा (१३ मतदारसंघ) २० मे २०२४ धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई (६ मतदारसंघ) (एकूण १३).

देशभरात कधी मतदान?
पहिला टप्पा – १९ एप्रिल २०२४
दुसरा टप्पा – २६ एप्रिल २०२४
तिसरा टप्पा – ७ मे २०२४
चौथा टप्पा – १३ मे २०२४
पाचवा टप्पा – २० मे २०२४
सहावा टप्पा – २५ मे २०२४
सातवा टप्पा – १ जून २०२४
निकाल – ४ जून २०२४

देशभरातील मतदारांची आकडेवारी काय सांगते?
१.८९ कोटी नवमतदार
१८ ते २१ वर्ष वयोगटात २१.५० कोटी मतदार
१८ ते २१ वर्ष वयोगटात ८५ लाख महिला मतदार
२० ते २९ वर्ष वयोगटात १९.४७ लाख मतदार
८२ लाख मतदार ८५ वर्षांवरील वयोगटातील
२ लाख १८ हजार मतदार १०० वर्षांवरील मतदार
४८ हजार तृतीयपंथी मतदार

मतदानाची वैशिष्ट्ये
आमच्याकडे ९७ कोटी नोंदणीकृत मतदार, १०.५ लाख मतदान केंद्रे, १.५ कोटी मतदान अधिकारी आणि सुरक्षा कर्मचारी, ५५ लाख ईव्हीएम, चार लाख वाहने आहेत.
८५ लाख वर्ष वयोगटावरील मतदार, ४० टक्क्यांहून अधिक दिव्यांगत्व असलेल्या मतदारांच्या घरी जाऊन मतदान घेणार, फॉर्म १२ डी भरुन देणाऱ्यांना सुविधा
मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, शौचालय, दिव्यांगांसाठी रॅम्प या व्यवस्था असणार
Know Your Candidate अॅपच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या उमेदवाराची माहिती मिळवता येणार
हिंसा रोखण्यासाठी अधीक्षक, जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
4 Ms: Muscle (शक्ती), money (पैसा), misinformation (अफवा) आणि MCC violations (आचारसंहिता भंग) या चार गोष्टींवर विशेष लक्ष
निवडणुकीत रक्तपात आणि हिंसाचाराला जागा नाही, जिथून हिंसाचाराची माहिती मिळेल, आम्ही त्यांच्यावर कारवाई करू
स्टार कॅम्पेनर्शना नियमावली देण्याचे पक्षांना आदेश, प्रचारात लहान मुलांना समाविष्ट न करण्याच्या स्पष्ट सूचना
संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर २१०० निरीक्षकांची करडी नजर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button