अशा लाल मातीत

“बापटांचा कोकणी बाणा”

गणेशोत्सवाच्या काळात ध्वनी प्रदूषणावर आवाज ऊठविणारे विद्यानंद बापट यांना मारहाण करत त्यांचा आवाज आणि त्यांचे म्हणणे दाबून टाकण्याचा प्रयत्नाचे पडसाद पुण्यात आणि महाराष्ट्रात उमटले. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुण्यातील गणेशोत्सवा निमित्ताने कर्णकर्कश ध्वनी प्रदूषण होऊ नये, यासाठी डीजे बंदी करावे हा खरे तर चर्चेचा विषय होता. मात्र मोठमोठ्या आवाजात डीजे लावून आणि एलइडी लाईटच्या प्रखर झोतात मिरवणूका काढूनच आमचा खरा गणेशोत्सव साजरा होणार. या विरोधात कोणी बोलले तर खबरदार अशी गर्भीत धमकीच सर्वसामान्यांना असते त्यामुळे मनात असूनही कोणी बोलत नव्हते आणि त्यांच्या वादाला प्रतिवादाचा सामना करत नव्हते. मात्र अस्सल कोकणीबाणा असणारा बापट उभा राहिला कोणताही वैचारिक , बोध्दिकतेचा अभिनिवेश नमानता थेट चर्चेला सामोरे जात इतिहासाची उदारणे देत. यात त्यांनी भल्याभल्यानां चितपट केले. अखेर मुद्याची लढाई गुद्यावर आली. मात्र तरीही बापट वैचारिक पातळीवर काही हटला नाही. विविध उदाहरणे देत तो आपला मु­द्दा मांडतच राहिला. सतत जनसामन्यांच्या मतांबरोबर आम्ही, झुंडी बरोबर आम्ही असे मत मांडणा-या राजकीय नेतृत्वांना मत व्यक्त करत सांगावे लागले पुणे सुसंस्कृत आहे, त्यांनी ती सुसंकृतता गणेशोत्सवात जपली पाहिजे आणि ते जपतील. मारहाणीचे समर्थन कदापी होऊ शकत नाही.

उत्सवाचे वेळी ध्वनीप्रदूषण थांबवा कर्कश डीजेचे जाहिर प्रदर्शन कशासाठी त्याचा त्रास मुलांना, वृध्दांना रुग्णांना सर्वसामान्य   माणसांना होत आहे. सारा परिसराचा थरकाप उडविणारा महाभयानक ध्वनी आणि त्याची कंपने यामुळे हाटेॲटॅक आल्याच्या घटना घडल्या आहेत. काही प्राण गेले आहेत. सर्वसामान्य माणसाला जगणे मुश्कील होत असतांना तो मात्र या विरोधात बोलू शकत नाही. बापट थेट बोलले त्याच्या या भूमिकेवर सारी माध्यमे तुटून पडली त्यांना अत्यंत आडवे उभे प्रश्न  विचारत आजचा एकांगी मेडीया जणू तुटून पडला. मात्र बापटांचे प्रचंड वाचन , व्यासंग, विविध संदर्भ, समय सुचकता, संयम  आणि  प्रसिध्दीपरान्मुखतेची भूमिका यामुळे माध्यमांचे प्रश्नच बोथट आणि संदर्भहीन झाले. उलट बापट यांचे प्रत्येक वाक्य तात्वीकतेचा नवा संदर्भ घेत सर्वसामान्यांच्या मनातील प्रिक्रिया व्यक्त करणारे होते. ” घटं विद्या पटं चिंध्या ” हा संस्कृत संदर्भ देत त्यांनी सवंग प्रसिध्दीच्या पार चिंधड्या उडवून टाकल्या.

सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी तर बापट कोकणातले त्यांनी पुणेकरांना संस्कृती शिकविण्याची गरज नाही. इत्यादी मुक्ताफळे उधळली. याचा अत्यंत शेलक्या शब्दात समाचार घेतांना त्यांनी लोकमान्य टिळकांचे उदाहरण देत सांगितले. लोकमान्य कोकणातील, त्यांनी पहिला सार्वजनिक गणेशोत्सव पुण्यात सुरु केला. या गणेशोत्सव ज्यावेळी अधिक विस्तारु लागला त्यावेळी महादेव गोविंद रानडे यांनी टिळकांना सांगितले होते. घरांतील गणपती  जो आपण सार्वजनिक बाहेर आणला आहेत तो पुन्हा घरात नेऊन ठेवा, गोपाळ गणेश आगरकर यांचेही तेच मत होते. बहूदा या मुलाखतकारांना हे संदर्भ लागले नसावेत त्यामुळे त्यांनी प्रश्नच बदलले. यांतील आगरकर तर बुध्दीप्रामण्यावाद भूमिका कणखरपणे मानणारे होते. याचाच संदर्भ घेत बापट थेट सांगतात उत्सवाची उत्सव म्हणून सार्वजनिक गरज राहीलेली नाही. सार्वजनिक उत्सव ही नागरी समस्या होऊ नये.

बापटांच्या याभूमिकेला पुणेकरांचा मिळणारा पाठींबा अभूतपुर्व आहे. एका बाजूला झुंड आणि सत्ता यांच्या मतांपेक्षा काही वेगळे मत मांडण्यास कोणी धजावले तर त्याला थेट देशद्रोही, राष्ट्रद्रोही, नक्षलवादी, दिमागी नक्षल आदी विविध विशेषणे जोडत त्यांचे फार खच्चीकरण करत त्याला नष्ट करण्याची वृत्ती वाढत आहे. या वातावरणात बापट या भूमिकेत थेट वैचारिक पातळीवर भिडत उत्तरे देत आहेत. खर्या अर्थाने ते सुसंकृत पुणे करांच्या मनातील बोलत आहेत. यामुळेच डीजे विरोधातील मोर्चाला पुणेकरांचा अभूतपुर्व प्रतिसाद लाभला. हे सकारात्मकतेचे लोणआता संपुर्ण महाराष्य्रात पसरत आहे. मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणविस यांनी तर नागपूरमध्ये डीजे बंदीचे थेट फतवाच पोलीस यंत्रणेतर्फे काढला.

डीजे, ध्वनी प्रदूषणाला विरोध म्डणजे थेट देवालाच विरोध, म्हणजे धर्माला विरोध  असा वाद रंगविण्याचा कट काही माध्यमानीं रंगविण्याचा प्रयत्न केला. त्यात बापट हे नास्तिक आहेत का ? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. आज नास्तिक असणे म्हणजे तो जणू माणूसच नाही असा भाव चेहऱ्यावर आणला जातो. मात्र बापट यांनी तितक्याच धीटपणे मुलाखतीत सांगितले हो मी नास्तिक आहे. आणि मला त्याचा अभिमान आहे. यावेळी त्यांनी “द गॅाड डिल्यूजन्स “ ह्या “रिचर्ड डॅाकिन्स “ यांच्या पुस्तकाचा संदर्भ दिला ज्यात देवाच्या अस्तित्वावरील विश्वासाची वैज्ञानीक आणि तर्कशास्त्रीय चिकित्सा केली आहे. तसेच धर्म आणि श्रध्दा यांचा मानवी समाजावर होणारा परिणाम तपासला आहे. हा वैज्ञानिक दृष्टीकोन इतक्या स्पष्टपणे मांडण्याची बापट यांची भूमिका थेट डॅा. नरेंद दाभोळकर यांच्या वैचारिक तर्कशुध्द मांडणीची आठवण करुन देणारी आहे. आजच्या एआय वैज्ञानिक जगतातील जेन झी आणि अल्फा तरुणाईला हा विज्ञानवादी चिकित्सक दृष्टीकोन अधिक आपलासा वाटत आहे. मनाला भिडत आहे ही बाब यानिमित्ताने जाणवत आहे. यामुळेच पुणे आणी संपूर्ण महाराष्ट्रातून या ध्वनीप्रदुषण चळवळीला मोठा प्रतिसाद लाभत आहे. 

विद्यानंद बापट यांचे मनापासून अभिनंद त्यांनी सर्वसामन्यांचा प्रश्नांला आवाज दिला. विद्यानंद बापट रत्नागिरी तालूक्यातील गोळप गावचे याच गोळप गावचे साथी एस एम जोशी ज्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेतृत्व करत मुंबईसह पुरोगामी महाराष्ट्र आम्हाला दिला हा कोकणी बाणा नवा इतिहास लिहीणारा ठरेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button