उद्योगमुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्त

पंचतारांकीत हॅाटेल” पर्यटनोद्योगाची महापर्वणी!

मावळतीचा सुर्य आपल्या गुलाबी किरणांची प्रभा नभोमंडपात फैलावत अरबी महासागराच्या निळ्यागर्द जलाशयात स्वतःला झोकून देत आहे. मांडवी बंदरावरील प्रवासी जेट्टीवर थेट समुद्रंच्या फेसाळत्या लाटांचे तुषार आपणाला रोमांचीत करत आहेत. मंद मंद होत जाणारा प्रकाश  आणि अंधाराला जवळ करणारी सायंकाळ परतीच्या सुचना देत असतांना मागे वळून पहावे तर गेटवे ॲाफ रत्नागिरीच्या गेट मधून दूर डोंगर माथ्यावर शेकडो चमकत्या प्रकाशलहरींनी उजळून निघालेले पंचतारांकीत हॅाटेल समुह आपणाला दिसतो.          थेट मुंबईच्या गेटवे ॲफ इंडीयावरील ताज इंटरनॅशनलच्या जागतिक अनमोलतेची जाणीव देणारा. लवकरच ही अनुभूती आम्हा रत्नागिरीकरांना येणार आहे. रत्नागिरी येथे कोट्यावधी रुपये गुंतवणूकीचा पंचतारांकीत हॅाटेल प्रकल्प येण्याची घोषणा नुकतीच रत्नागिरीच्या पालकमंत्र्यांनी केली. रत्नागिरीकरांसाठी पर्यटन उद्योगाची महापर्वणीच मानावी लागेल. तमाम रत्नागिरी करांनी या पंचतारांकीत संस्कृतीचे भरभरुन स्वागत केले पाहिले. खर्या अर्थाने रत्नागिरी शहर आणि परिसराला येथील तरुणाईला रोजगाराची संधी देणारा हा प्रकल्प रत्ननगरीच्या पर्यटन आणि उद्योग आदी विकासपर्वाचा  माईलस्टोन ठरणार आहे. 

एक्सप्रेस ग्रुपमार्फत १०० कोटीच्या गुंतवणूकीचे हे भव्य असे पंचतारांकीत हॅाटेल उद्योग रत्नागिरी शहरात समुद्रापासून फक्त १ किमी अंतरावर सुरु होत आहे. पाठोपाठ जयगड येथील महिंद्र या कंपनीचे खुप वर्षापुर्वीचे रिसॉर्ट आता पचंतारांकीत रुप धारण करणार आहे. गणपतीपुळे येथेही हॅाटेल इंडस्टि् तेथील धडपडणार्या उद्योगकांच्या मेहनतीने मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. खरं तर रत्नागिरीला पर्यटन हा उद्योगच खर्या अर्थाने रोजगाराच्या अधिकाधिक संधी देणारा आणि कोकणला औद्योगिक वैभव प्राप्त करुन देणारा ठरणार आहे.

  सध्या रत्नागिरी हा जागतिक नकाशावरील समुद्र किनारी असणारे पर्यटन शहर म्हणून प्रसिध्दीला येत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्वित्झर्लंड येथील दाओसच्या औद्योगिक लाखो कोटीचे करार होणाऱ्या व्यासपीठावर याची चर्चा असणे हे रत्नागिरीकरांना अभिमानास्पदच आहे. रत्नागिरी स्मार्ट शहर म्हणून अत्यंत वेगाने विकसीत होते आहे. येथील अप्रतिम व्हर्जीन समुद्र किनारे, येथील मत्स्याहारी आहार रेसीपीज सोबत आंबा , काजू, कोकम, फणस, नारळ यांची साथ खवैयांना आणि पर्यटकांना मनमुराद तृप्तीचा आनंद देते. संपर्क यंत्रणाही जागतिक दर्जाची विकसीत झाली आहे. मुंबई ते मडगाव पासून थेट चार तासात अत्यंत आरामदाई आणि वेगवान रेल्वेने पोहोचता येते. लवकरच विमान सेवा पर्यटक आणि उद्योजकांच्या सेवेसाठी रुजू होत आहे. मुंबई गोवा महामार्ग जरी रखडला तरी आता तो फारच सुंदर आणि विस्तीर्ण होत आहे. मुंबईतून थेट ५-६ तासात रत्नागिरीत पोहोचता येईल , लवकरच मिर्या- नागपूर मार्ग पुर्ण होत आहे. कोल्हापूर -सांगली -सातारा संपुर्ण  पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ कोकणला काही तासांच्या अंतरात जोडला जात आहे. रत्नागिरी हे मेडीकल, इंजिनिअरींग, फार्मासीटीकल आणि विविध कौशल्याधारीत उच्च शिक्षण सुविधांने राज्यातील महत्वाचे शैक्षणिक हब झाले आहे, या माध्यमातून या शहराकडे येणारा जनांचा प्रवाह 

कोकणातील समुद्र आणि मासे आणि येथील खाद्य संस्कृती हे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ मराठवाडा याचे विलक्षण आकर्षण आहे. सोबत येथील श्रध्दास्थाने , तिर्थस्थळे, किल्ले, कातळशिल्पे, गुहा, देवळे , दुर्मिळ जंगले यांनी या पर्यटनाला व्यापकतेची जोड दिली आहे. अत्यंत प्रशस्त , वेगवान चौपदरी महामार्गामुळे हे अंतर अत्यंत कमी आणि आरामदायी आनंदयम प्रवासाचे आहे. कोल्हापूरहून समुद्रावर चक्कर करण्यासाठी आणि मासे खाण्यासाठी सकाळी येऊन संध्याकाळी परतण्याचा ट्रेड क्रेझ पुढील काळात अशक्य नाही. 

आंतरराष्ट्रीय पर्यटन वाढीसाठी ज्या प्रमुख बाबी आवश्यक आहेत त्यात उत्तम कनेक्टीव्हिटी यांत विमान सेवा, ट्रेन, रस्ते आणि वॅाटर टॅक्सी ही तर आज रत्नागिरीचे खास वैशिष्ठ्यच होणार आहेत, दर्जेदार हॅाटेल्स आणि रिसॉर्ट ते तर सध्या आहेतच परंतू येत्या काही वर्षात त्याला पंचतारांकीत आणि सप्ततारांकीत लूक येणार आहे.

आकर्षक पर्यटनस्थळे :या बाबत तर रत्नागिरीने महाराष्ट्रातील अनेक शहरांना मागे टाकले आहे. समुद्र किनारे सोबत भगवती बंदर, रत्नदुर्ग किल्ला, त्या जवळच उभी राहिलेली समुद्राच्या गाजेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यकथेची प्रेरणा देणारी शिवसृष्टी, थीबा पॅलेस, थीबा गार्डन आणि तेथील समुद्राला आव्हान देणारा छत्रपती सभांजीराजे यांचा पुर्णाकृती पुतळा, अवकाश दर्शन देणारे तारांगण, तेथील कोकण सुपुत्र भारतरत्नांचा इतिहास सांगणारे दालन, मत्सालय, पंढरीच्या दर्शनाचे पुण्य देणारा पुर्णाकृती विठूराया ही यादी वाढतच जाणारी. कवी केशवसुतांचे जागतिक दर्जाचे काव्य स्मारक , कवितेची राजधानी,सर्वाधिक पर्यटकांचे आकर्षण असणारे गणपतीपुळे , पावसचे स्वामी स्वरुपानंद स्मारक , जणू रत्नागिरी शहरात किमान १०-१२ दिवसांचा मुक्का करावाच लागेल अशी. यांतील नव्या संकल्पना त्याचे आयोजन नियोजन आणि ऊभारणीतील कल्पकतेचे श्रेय  रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांचे, त्यांची अथक मेहनत, कल्पकता आणि कोट्यावधीचा निधी आणण्याची विलक्षण क्षमता यामुळे रत्नागिरीच्या पर्यावरण विकासाच्या नवसंकल्पनेचे अवकाश आता क्षितीजापार विस्तारु लागले आहे.

कोकणात यापुर्वी १९९४ मध्ये ताज ग्रुपच्या माध्यमातून वेंगुर्ला शिरोडा येथे पंचतारांकीत प्रकल्प जाहिर झाला. ५४. ४० हेक्टरवर हा प्रकल्प होणार होता. त्याकाळात स्थानिक पातळीवर त्याला मोठा विरोध झाला. त्यातील पर्यावरण आणि स्थानिक भूमीपुत्रांचा रोजगाराचा प्रश्न वगैरे विषय होते. मात्र नुकताच ३० जून २०२६ रोजी महाराष्ट्र शासन आणि ताज यांचे सोबत करार होऊन या प्रकल्पाला चालना मिळाली आहे.

रत्नागिरी येथे होणारा पंचतारांकीत प्रकल्प तर रत्नागिरी शहराच्या मध्यवर्ती भागालगतच येत आहे. यामुळे या माध्यमातून मोठी संधी येथील तरुणांना मिळेल , परदेशी पर्यटकांची आवक वाढेल, या प्रकल्पाला रत्नागिरीकरांचे  अभूतपुर्व  सहकार्य असणारच, हा प्रकल्प येथील नव्या अद्ययावत इन्फ्रास्ट्रक्चरच्या गतीमानतेला नवा आयाम देणारा ठरेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button