मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्तशैक्षणिक

मुंबई विद्यापीठ कोकण झोन आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ एस. पी. हेगशेटये महाविद्यालयात उत्साहात संपन्न.

रत्नागिरी :- मुंबई विद्यापीठ, मुंबई-कोकण झोन स्पोर्ट्स कमिटी आणि नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या एस. पी. हेगशेटये कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा (मुले-मुली) २०२६ चा बक्षीस वितरण समारंभ  दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाला.

या समारंभास प्रमुख पाहुण्या सौ. सीमा हेगशेटये मॅडम त्यांच्या हस्ते विजेत्या खेळाडू व संघांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धेचे प्रमुख संयोजक प्रा. सुशील साळवी यांनी केले.

दि.१ व २ सप्टेंबर रोजी झालेल्या या स्पर्धेत ३० महाविद्यालयांतील १२० हून अधिक खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. दोन दिवस रंगलेल्या या स्पर्धेत खेळाडूंनी उत्कृष्ट बुद्धिबळ कौशल्याचे प्रदर्शन करत चुरशीच्या लढती दिल्या.

पुरुष गटातील [संघ]

प्रथम क्रमांक – संत राऊळ महारज महाविद्यालय ,कुडाळ. 

व्दितीय क्रमांक – आर.पी.गोगटे-जोगळेकर महाविद्यालय ,रत्नागिरी.

तृतीय क्रमांक – ज्ञानदिप महाविद्यालय, खेड.

महिला गटातील

प्रथम क्रमांक –  आर.पी.गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी.

द्वितीय क्रमांक – दापोली अर्बन बँक महाविद्यालय, दापोली

तृतीय क्रमांक – डि बी.जे महाविद्यालय, चिपळूण.   

           पुरुष गटातील(वैयक्तिक)

प्रथम क्रमांक –   मयुरेश परुळेकर एस आर एम कुडाळ. 

द्वितीय क्रमांक –  श्रीहांस नारकर,   डी बी जे चिपळूण. 

तृतीय क्रमांक – जियाद सोलकर   एस पी हेगशेट्ये महाविद्यालय रत्नागिरी 

        महिला गटातील (वैयक्तिक) 

प्रथम क्रमांक – खुशी विश्वकर्मा डी बी जे कॉलेज चिपळूण.

व्दितीय क्रमांक – सानिया चव्हाण एस आर एम कुडाळ. 

तृतीय क्रमांक – हिमानी फाटक,  गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी. 

स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आर्बिटर श्री. विवेक सोहनी, श्री. उपेंद्र खरे व श्री. साहस नारकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

याप्रसंगी एस पी हेगशेट्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गवाळे, प्रा. सुकुमार शिंदे, महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी, विविध महाविद्यालयाचे संघ व्यवस्थापक त्याच बरोबर श्री. राम कदम, श्रीमती निधी पडवळ आणि श्री. मंगेश सकपाळ आणि स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी क्रीडा विभाग प्रमुख प्रा. सुशील साळवी, प्राद्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि स्वयंसेवक यानी परिश्रम घेतले .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अश्विनी कांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. हर्षदा शिऊडकर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button