जागतिक फिजीओथेरपी दिना निमित्तानेआयोजित एस एम जोशी फिजीओथेरपी महाविद्यालयाचे “स्ट्रोक आणि हृदयविकार” जागरुकता शिबीर संपन्न

रत्नागिरी :-:आजच्या व्यस्त आणि ग्रस्त जीवनशैलीतील हृदयविकार ही समस्या तरुणांपासून वृध्दांपर्यंत जोडली गेली आहे. स्ट्रोक आणि हृदयविकार होण्यापूर्वीच कोणती जागरुकता घ्यावी यासाठी विशेष आणि अनोखे असे जनजागृती शिबीर एस एम जोशी फिजीओथेरपी महाविद्यालयाने रत्नागिरी येथे आयोजित केले होते. या शिबीराला न्यूरोलॅाजीस्ट डॅा. सचिन यादव आणि रत्नागिरीतील वैद्यकीय क्षेत्रातील जेष्ठ डॅाक्टर अलिमियाँ परकार यांनी मार्गदर्शन केले यावेळी डॅा. राजेद्र कशेळकर, कॅालेज डायरेक्टर ऋतुजा हेगशेट्ये, सीमा हेगशेट्ये आदी उपस्थित होते.
आरोग्य क्षेत्रात फिजीओथेरपी महत्व अत्यंत वाढत आहे.
पुर्वी फिजीओ म्हणजे मसाज अथवा विशीष्ठ प्रकारचे व्यायाम ह्यापुरते ते मर्यादित होते. मात्र आज जागतिक पातळीवर फिजीओ हे शास्त्र अत्यंत प्रगत झाले आहे. उत्तम हायटेक फिजीओथेरपीस्टच्या मदतीने अनेक अवघड शस्त्रक्रिया टाळल्या जाऊ शकतात असे तज्ञांचे मत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील प्रत्येक विभागाला फिजीओथेरपी गरजेची झाली आहे.
स्ट्रोक आणि न्यूरोलॅाजिकल आजारामध्ये फिजीओथेरपीचे महत्व अनन्यसाधारण आहे. या वेळी रत्नागिरीतील जेष्ट न्यूरोलॅाजिस्ट डॅा. सचिन यादव यांनी मेंदू त्याचे कार्य, त्याचे आजार त्याच्यावरील उपाय त्याची कार्यपध्दती आणि त्या सोबत फिजीओचा संबध यावर अत्यंत उत्तम स्वरुपाची प्रदिर्घ माहिती असणारी पीपीटी व्याख्यान दिले. आपल्या फक्त ४५ मिनिटांच्या पीपीटी प्रेझेंटेशन मध्ये न्यूरो सायन्सचा पुर्णआढावाच घेतल्याची प्रतिक्रिया डॅा. अलिमियाँ परकार यांनी व्यक्त केली. फिजीओच्या विद्यार्थ्यांसाठी ती फारच मौल्यवान आणि महत्वपूर्ण होती.
यावेळी संस्था अध्यक्ष अभिजित हेगशेट्ये यांनी मान्यवरांच्या सहकार्याचे विशेष आभार व्यक्त करतांना रत्नागिरी येथे नवनिर्माण संस्थेच्या माध्यमातून सुरु झालेले फिजीओथेरपी महाविद्यालया मार्फत विद्यार्थ्यांना अद्ययावत शिक्षण आणि सर्वात्तम प्रॅक्टीकलची संधी देण्याचा संस्थेचा प्रयत्न असून लवकरच महाविद्यालय स्वतःची फिजीओ ओपीडी सुरु करणार आहे. या महाविद्यालयाचा लाभ कोकणवासीयांनी मोठ्या संख्येने घ्यावा असे आवाहन केले.
जागतिक फिजीओथेरपी दिना निमित्ताने आयोजित एसएम जोशी कॅालेज ॲाफ फिजीओथरपी महाविद्यालयाने या शिबीराचे आयोजन केले होते. यांत सर्व विद्यार्थी , प्राध्यापक यांचा सहभाग होता.
महाविद्यालयाने आयोजित या अनोख्या शिबिरात रक्त तपासणी, ब्लड प्रेशर तपासणी, हार्ट रेट, रेस्पीरेटरी, आदी तपासण्या करण्यात आल्या याला विद्यार्थी पालक यांचा मोठा प्रतिसाद होता.



