मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्तशैक्षणिक

परिस्थितीवर मात करत वेदा चिचकरने मिळवले ९४ टक्के गुण   

संगमेश्वर : घरची परिस्थिती बेताची असताना स्वयं प्रेरणेने अभ्यासाला वाहून घेत न्यू इंग्लिश स्कूल कसबा हायस्कूलच्या वेदा शैलेंद्र चिचकर हिने ९४ टक्के गुण मिळवले आहेत. कोणतीही खासगी शिकवणी न लावता इतके गुण मिळवल्याने वेदाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पंचक्रोशीतील अनेक शाळांमधील प्रथम, द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांची नवनिर्माण महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संजना चव्हाण प्रत्यक्ष भेट घेत घेऊन त्यांचे अभिनंदन करीत उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांना शुभेच्छा देत आहेत. वेदा चिचकरने हिने आपण कोणताही खासगी शिकवणी लावली नसून, शाळेच्या मुख्याध्यापिका आस्मा जुवळे व शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच हे यश मिळवल्याचे सांगितले. भविष्यात तिला आयएएस व्हायचे आहे, असेही तिने यावेळी सांगितले. वेदाचे वडील शैलेंद्र हे रिक्षाचालक असून त्यांची घरची परिस्थिती बेताची आहे.

“शहरी भागातील विद्यार्थी चांगले गुण मिळवून यश संपादन करतात; मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थी हा अनेक संकटाना तोंड देत यश मिळवतो. त्यांच्याकडे मात्र दुर्लक्ष होते. गुणसंपदा असताना तो शैक्षणिक प्रवाहात येईल का नाही याबाबत अनेकवेळा शंका असते. यशस्वी विद्यार्थ्यांना वाड्या वाड्यामध्ये शोधून त्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याचा छोटासा प्रयत्न ‘नवनिर्माण’ची टीम करीत आहे. वेदाचे ध्येय मोठ्ठे असून, अशी मोठी धेय्य ठेवणारे विद्यार्थी हेच खरे संगमेश्वरचे भविष्य ठरतील,अश्या विद्यार्थ्यांना जपले पाहिजे,” असे संगमेश्वर नवनिर्माण महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संजना चव्हाण यांनी सांगितले.

कोंडये येथील मधली वाडी, गुरववाडी, दसमवाडी, देवळाची वाडी येथील यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button