मुख्य बातमी

रत्नागिरी रोटरी क्लबतर्फे कुडाळच्या संस्थेला मदत 

रत्नागिरी : रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी आणि ॲड. कल्पलता भिडे यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) येथील जीवन आनंद संस्थेतील गरजू लोकांसाठी एक टेम्पो भरून कपडे देण्यात आले.

रोटरी क्लबतर्फे नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात; तसेच सामाजिक काम करणाऱ्या संस्थांना ‘रोटरी’ मदतीचा हात पुढे करते. ‘रोटरी’चे ज्येष्ठ सदस्य धरमसी चौहान ह्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रोटरी सदस्य तसेच मित्र परिवाराने जुने पण सुस्थितीतील कपडे स्वच्छ धुवून इस्त्री केलेले कपडे या संस्थेला दिले. श्री. चौहान आणि ॲड. भिडे यांच्या पुढाकाराने दरवर्षी अशाप्रकारे वर्षभर लोकांकडून कपडे गोळा करून ते एकत्रितपणे जीवन आनंद संस्थेला दिले जातात.

या वेळी रोटरी अध्यक्ष श्रीकांत भुर्के आणि सचिव प्रमोद कुलकर्णी, तर संस्थेतर्फे जनसंपर्क अधिकारी महाबळेश्वर कामत आणि अमर पाडावे उपस्थित होते. या संस्थेमध्ये सुमारे २०० हून अधिक मनोरुग्ण आणि गरजू व्यक्ती आहेत. संस्थेच्या या समाजाभिमुख कार्यात रत्नागिरीमधील नागरिकांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर असल्याचे संस्थेच्या अधिकाऱ्यांनी नमूद करून आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button