मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्त

दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा विरोधात दाखल अविश्वास ठराव 16 विरुद्ध 1 ने झाला मंजूर.

 

दापोली : अपात्रता ठराव बेकायदेशीर असल्याचा नगराध्यक्ष ममता मोरे यांचा आरोप

माझ्या काही सहकारी भ्याडपणा केला मात्र मी बाळासाहेबांची निष्ठावंत शिवसैनिक – नगराध्यक्ष ममता मोरे

उद्धव ठाकरे गटाच्या नगराध्यक्ष ममता मोरे यांच्या विरोधात अविश्वास ठरावाने दापोलीतील राजकारण पेटले

अविश्वास ठरावा विरोधात हायकोर्टात पिटीशन दाखल

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नगरपंचायत नगराध्यक्ष विरोधात अविश्वास ठराव विशेष सभेत मांडण्यात आला ,ठराव्याच्या बाजूने 16 तर ठरावाच्या विरोधात 1 मत पडले त्यामुळे अविश्वास ठराव मंजूर झाला आहे परंतु या अविश्वासा ठरावा विरोधात नगराध्यक्षा ममता मोरे कोर्टात गेल्याने त्यांना कोर्टाकडून दिलासा मिळतो की पाय उतार होण्याची वेळ येते हे पुढील काळामध्ये स्पष्ट होणार आहे.

दापोली नगर पंचायतीत उद्धव ठाकरे गटाची सत्ता होती, मात्र ठाकरे गटातील आठ नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन करून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश केला, तेव्हापासूनच नगराध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग आला होता. अखेर अविश्वास ठराव पारित झाला . सहा महिन्यात नगराध्यक्ष विरोधात दोन अविश्वास ठराव दाखल झाल्याने ममता मोरे यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे .

मी बाळासाहेबांची निष्ठावंत शिवसैनिक असल्याने हार मानणार नाही , माझे सहकारी भ्याड निघाले पण पक्ष सोडणार नाही अशी भावना त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button