देश-विदेशमुख्य बातमी

एअर स्ट्राइकनंतर अवघा देश भारतीय लष्कराच्या पाठीशी एकवटला, सर्वच स्तरातून ‘जय हिंद’चा जयघोष!

दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानस्थित दहशवाद्यांना ‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे चोख प्रत्युत्तर दिले आहे. बुधवारी मध्यरात्री भारतीय लष्कराने पाकिस्तानातील ९ दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य केले आहे.

दक्षिण काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या दोन आठवड्यांनंतर हे भारतीय लष्कराने ही कारवाई केली आहे. भारतीय लष्कराच्या या कारवाईनंतर देशभरातून समाधन व्यक्त केले जात आहे. दरम्यान भारताने दिलेल्या या प्रत्युत्तराचे सर्वसामान्यांसह राजकीय वर्तुळातील नेत्यांनी भारतीय लष्कराचे कौतुक केले आहे.

या हवाई हल्ल्यानंतर देशाचे संरक्षण मंत्री यांनी सर्वप्रथम एक्सवर एका ओळीची पोस्ट केली. त्यामध्ये त्यांनी “भारत माता की जय”, असे म्हटले आहे. याचबरोबर काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही, “आपल्या सशस्त्र दलांचा अभिमान आहे. जय हिंद!”, अशी पोस्ट केली आहे.

दुसरीकडे जम्मू आणि काश्मीरमध्येही भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ पार पाडल्यानंतर स्थानिकांनी ‘भारतीय सेना झिंदाबाद’ आणि ‘भारत माता की जय’ च्या घोषणा दिल्या आहेत. तर राजस्थानमध्ये नागरिकांनी फटाके फोडत लष्कराने पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांवर केलेल्या कारवाईचे स्वागत केले आहे. सोशल मीडियावर याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button