स्वच्छ सुंदर सोसायटी, अपार्टमेंट स्पर्धा

रत्नागिरी : स्वच्छता ही सेवा (SHS) या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व सोसायटी, अपार्टमेंटमध्ये स्पर्धेचे नियोजन करण्यात आलेले आहे.
स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून ०२ ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस (SBD) म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने स्वच्छता ही सेवा (SHS) मोहिम १४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये राबविण्यात येत आहे. या वर्षीच्या स्वच्छता ही सेवा २०२४ साठी “स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता” ही थीम केंद्र शासनाने निश्चित केली आहे. त्यानुसार स्वच्छता की भागीदारी अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व सोसायटी, अपार्टमेंटमध्ये स्पर्धेचे नियोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेसाठी खालील मुद्यांच्या आधारे नियोजन करण्यात येणार आहे.
सहभागासाठी निकष :
सोसायटी/अपार्टमेंट जिल्ह्यातील ग्रामपंचायत परिक्षेत्रातील असणे आवश्यक
सोसायटी/अपार्टमेंट नोंदणीकृत असणे आवश्यक
सहभागाकरिता नोंदणी :
सोसायटी/अपार्टमेंट यांनी मा. गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडे अर्ज सादर करावा. (अर्जाचा नमुना जिल्हा परिषद संकेतस्थळ www.zpratnagiri.org वर प्रसिध्द करण्यात आलेला आहे.)
अर्जासोबत सोसायटी/अपार्टमेंट नोंदणीकृत असल्याबाबतचा दाखला सादर करावा.
सोसायटी/अपार्टमेंट मध्ये स्वच्छता विषयक केलेल्या कामांचा अहवाल सोबत सादर करावा.
स्पर्धेचा कालावधी :
१) स्वच्छ सुंदर सोसायटी/अपार्टमेंट स्पर्धेची प्रसिध्दी – दि.१४/०९/२०२४ ते दि.१७/०९/२०२४
२) नोंदणी (अर्ज सादर करण्याची मुदत) – दि.२०/०९/२०२४ रोजी सांय. ५.०० वा. पर्यंत
३) तालुकास्तरीय तपासणी – दि.२५/०९/२०२४ ते दि.२६/०९/२०२४
४) तालुकास्तरीय निकाल – दि.२७/०९/२०२४
५) जिल्हास्तरीय तपासणी – दि.२९/०९/२०२४ ते दि.३०/०९/२०२४
६) जिल्हास्तरीय निकाल – दि.०१/१०/२०२४
७) पारितोषिक वितरण – दि.०२/१०/२०२४
मूल्यमापनाचे निकष :
घनकचरा व्यवस्थापन
✓ कचरा वर्गीकरण
✓ ओला कचरा प्रक्रिया
✓ प्लास्टिक कचरा साठवणूक
सांडपाणी व्यवस्थापन
✓ घरातुन बाहेर पडणारे पाणी (Grey water) शोचालयातुन बाहेर पडणारे पाणी (Black water)
पाऊस पाणी संकलन
निवड प्रक्रिया :
प्रथम मूल्यमापन तालुकास्तरीय समिती मार्फत केले जाईल.
मुल्यमापनामध्ये दिलेल्या निकषानुसार व त्यासाठी असलेल्या गुणानुसार सोसायटी/अपार्टमेंट यांना गुणानुक्रम देण्यात येईल.
गुणानुक्रमानुसार तालुकास्तरावर प्रथम येणा-या सोसायटी/अपार्टमेंटची निवड जिल्हास्तरीय तपासणीसाठी करण्यात येईल. त्यांची तपासणी जिल्हास्तरीय समिती मार्फत केले जाईल.
मुल्यमापनामध्ये दिलेल्या निकषानुसार व त्यासाठी असलेल्या गुणानुसार सोसायटी/अपार्टमेंट यांना जिल्हास्तरीय समिती मार्फत गुणानुक्रम देण्यात येईल.
गुणानुक्रमानुसार जिल्हास्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय येणा-या सोसायटी/अपार्टमेंट यांना पारितोषिक दिले जाईल.
पारितोषिक जिल्हास्तर : प्रथम – ५० हजार रुपये, द्वितीय – ३० हजार रुपये, तृतीय – २० हजार रुपये.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व सोसायटी/अपार्टमेंट यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेवून स्वच्छता ही सेवा २०२४ अभियान यशस्वी करावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार यांनी केले आहे.



