मुख्य बातमी

रत्नागिरीत लवकरच नमन महोत्सव : उदय सामंत

रत्नागिरी : कोकणच्या लोककलावंतांचा सन्मान करणे म्हणजे आपल्या मूळांचा सन्मान करणे होय. यावेळी लोककलेला राजाश्रय देण्याचे काम आमचे महायुतीचे सरकार करत आहे. या कलावंतांचा आशीर्वाद माझ्यासाठी भाग्याचा आहे. त्यामुळे रत्नागिरीत लवकरच नमन महोत्सव सुरू करणार असल्याचे राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले आहे.

रत्नागिरीतील हातखंबा येथे उदय सामंत प्रतिष्ठान आणि नमन लोककला रत्नागिरी जिल्हा (रजि.) तालुका शाखा रत्नागिरी, कोकण नमन कलामंच रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सन्मान लोककलावंतांचा‘ या कार्यक्रमाला ना. सामंत यांनी शुक्रवारी (१३ सप्टेंबर) उपस्थिती दर्शवली. याप्रसंगी कोकण नमन कलामंचचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर कांबळे, संस्थापक श्रीधर खापरे, जिल्हा सािाव परशुराम मासये, जिल्हा उपाध्यक्ष युयुत्सू आर्ते, खजिनदार सुरेश येजरे, तालुका उपाध्यक्ष अण्णा कळंबटे, ज्येष्ठ नमन कलावंत शांताराम मालप, देवरुखचे उपसभापती थेले, कलावंत मानधन समितो सदस्य हरिशांद्र बंडबे, रत्नागिरीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे, गटविकास अधिकारी जे. पी. जाधव यांसह मोठ्या संख्येने नमनप्रेमी उपस्थित होते.

पूर्वीपासून चालत आलेली कोकणची संस्कृती आजही या नमन, जाखडी, भजन कलेच्या माध्यमातून जपली जात आहे. या लोककलावंतांमुळे आपली संस्कृती आजही जिवंत असल्याचे श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले. त्याच कोकणच्या नमन, जाखडी अशा लोककलावंतांचा सन्मान करणे म्हणजे आपल्या मूळांचा सन्मान करणे होय. यावेळी लोककलेला राजाश्रय देण्याचे काम आमचे महायुतीचे सरकार करत आहे. या वर्षी देखील अनेक लोककलावंतांना पेन्शन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कलावंतांचा आशीर्वाद माझ्यासाठी भाग्याचे आहे, तसेच रत्नागिरीत लवकरच नमन महोत्सव सुरू करणार असल्याचे यावेळी सांगितले.

कोकण नमन कला मंचा रत्नागिरी या संस्थेच्या व जंबो कार्यकारिणीच्या या वार्षिक सर्वसाधारण सभेत रत्नागिरी, लांजा, संगमेश्वर या तालुक्यातील नमन मंडळे व कलावंतांची मोठी उपस्थिती होती. त्यावेळी उपस्थित नमन व जाखडी मंडळांना उदय सामंत प्रतिष्ठानायावतीने आर्थिक मदत निधी वितरण करण्यात आले. तसा पेन्शनधारक नमन कलावंत व ज्येष्ठ कलावंत आणि ५० पेक्षा जास्त नमन प्रयोग करणाऱ्या मंडळांचा पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला नमन लोककला रत्नागिरी जिल्हा (रजि.) तालुका शाखा रत्नागिरी, कोकण नमन कलामंचचे पदाधिकारी सुरेश होरंबे, विलास भातडे, धनावडे, तालुका सचिव विश्वनाथ गावडे, पांडुरंग होरंबे, सुरेश दसम, भिकाजी भुवड, चंद्रकांत पालकर, श्रीकांत बोंबले यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थिती होती. नमन लोककला संस्था स्थापना आणि कलावंतांना शासनस्तरावरील लाभार्थ्यांना योजनांविषयी सविस्तर माहिती विश्वनाथ गावडे यांनी उपस्थितांसमोर विषद केली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्यक्ष अण्णा कळंबटे यांनी केले. मानधन समिती सदस्य हरिश्चंद्र बंडबे यांनी नमन कलावंतांसाठी मानधन प्रस्ताव, पेन्शन प्रस्ताव व त्यावर ऑनलाईन कार्यवाहीची माहिती दिली. त्यासाठी नमन कलावंतानांनी जास्तीत जास्त परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन बंडबे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button