मुख्य बातमीराजकीय

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत जाहीर केल्या आहेत. आज (१६ मार्च) दुपारी ३ वाजता लोकसभा निवडणुकीचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. कोणत्या जिल्ह्यात कधी मतदान होणार, मतदानाची तारीख हे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. ९७ कोटी मतदार या निवडणुकीमध्ये सहभागी होणार आहेत. ही लोकसभा निवडणूक सर्वांत मोठी निवडणूक सांगण्यात येत आहे.
‘जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची निवडणूक घेणे हे आव्हान असून, या निवडणुकीची तयारी दोन वर्षांपासून सुरू होती. मी स्वत: ८० जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. ९७ कोटी नोंदणीकृत मतदार आहेत. देशात साडेदहा लाखाहून अधित मतदान केंद्र आहेत. ११ राज्यातल्या निवडणुका आतापर्यंत शांततेत पार पडल्या आहेत. आमच्यावरच्या कोर्ट केसेस देखील कमी झाल्या आहेत. शहरी आणि ग्रामीण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न आम्ही करत आहोत. यंदा १ कोटी ८२ लाख नवीन मतदार असणार आहेत. ५५ लाख एव्हीएम मशीन असणार आहेत आणि १ कोटी ५ लाख निवडणूक अधिकाऱ्यांसह सुरक्षा रक्षक असणार आहेत. या निवडणुकीचा निकाल १३मेला जाहीर होणार आहे,’ अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button