मुख्य बातमी

कोकण रेल्वे मार्गावर धावणार मडगाव-मुंबई वन वे स्पेशल ट्रेन

रत्नागिरी : दिवाळी सणानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावर मडगाव जंक्शन ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशी वनवे स्पेशल गाडी १ नोव्हेंबर रोजी धावणार आहे.

या संदर्भात कोकण रेल्वे कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मडगाव जंक्शन ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (02052) ही एक मार्गी विशेष गाडी १ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता मडगाव जंक्शनवरून सुटेल आणि मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला ती त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजून २० मिनिटांनी पोहोचेल.

ही गाडी थिवी, सावंतवाडी रोड, कुडाळ, कणकवली, रत्नागिरी, चिपळूण रोहा, पनवेल स्थानकांवर थांबेल.

या वनवे स्पेशल गाडीला सध्या कोकण रेल्वे मार्गावर धावत असलेल्या जनशताब्दी एक्सप्रेस प्रमाणे एक विस्टा डोम कोच, एसीचे चेअर कार 3, सेकंड सेटिंगचे १० डबे तसेच जनरेटर कार व एस एल आर चा प्रत्येकी एक असे एकूण १६ डबे जोडण्यात येणार आहेत.

प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वेकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button