Uncategorized

स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाच्या अध्यक्षपदी शिल्पा पटवर्धन, तर उपाध्यक्षपदी विनायक कुलकर्णी

कार्यकारी मंडळ सदस्य षड्वार्षिक निवडणूक  

रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, पावस (रत्नागिरी) या मंडळाची कार्यकारी मंडळ सदस्य षड्वार्षिक निवडणूक आज मुंबई येथे झाली. अमर देसाई व हृषिकेश पटवर्धन यांच्या पॅनेलने एकतर्फी विजय मिळवला. श्रीमती शिल्पाताई पटवर्धन यांची अध्यक्ष आणि विनायक कुलकर्णी मुंबई यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

यामध्ये एकूण मतदान ३२८ झाले व बाद मते ५ झाली. त्यामुळे वैध मते ३२३ झाली. एकूण १५ उमेदवार निवडणुकीत उभे राहिले होते. त्यातील २ उमेदवार हेमंत उर्फ विजय रघुनाथ देसाई आणि अनंत रघुनाथ देसाई यांना पराभवाचा धक्का बसला.

विजयी उमेदवाराची नावे आणि कंसात मिळालेली मते : अमोल पद्माकर ढमढेरे (२९९), नंदकिशोर जनार्दन बुवा (३०२), शरद वसंत कदम (३०२), शशिकांत शांताराम सरफरे (३०४), आशुतोष लक्ष्मण साठे (३०४), उमेश अशोक जामसांडेकर (३१०), सीए मंदार यज्ञेश्वर गाडगीळ (३०३), नरेंद्र वसंत देसाई (३१०), हेमंत मनोहर गोडबोले (३००), रामचंद्र (अमर) जयंत देसाई (३१३), ऋषिकेश जयंत पटवर्धन (३११), राजेंद्र केशव जोशी (३००), डॉ. शरदचंद्र गोविंद जोशी (२९९) यांनी विजय मिळवला.

या निवडणुकीसाठी श्रीकांत दुदगीकर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button