संगमेश्वर बाजारपेठेमध्ये जनजागृती रॅली
नवनिर्माण महाविद्यालय, नर्सिंग महाविद्यालय आणि संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजन

संगमेश्वर : येथील नवनिर्माण महाविद्यालय, नवनिर्माण नर्सिंग विद्यालय संगमेश्वर आणि संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या वतीने नशा मुक्त भारत अभियानअंतर्गत जनजागृती रॅली काढण्यात आली.
संगमेश्वर बसस्थानक ते बाजारपेठेतून ही रॅली काढण्यात आली. या रॅलीला प्राचार्य डॉ. संजना चव्हाण, डॉ. प्रज्ञा कदम, संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे, प्रशांत शिंदे, सचिन कामेरकर, किशोर जोयशी, महिला पोलीस उपस्थित होते.
ही जनजागृती रॅली संगमेश्वर बाजारपेठेतून बसस्थानकापर्यंत काढण्यात आली. यावेळी नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केली. प्रवाशांना तसेच ग्रामस्थांना नशा मुक्ती विषयक संदेश दिला. ही रॅली यशस्वी करण्यासाठी प्रा. संतोष खरे, अनिल नेमन, प्रशांत जाधव, नेहा जोईल, तेजस्विनी सावंत, पूजा बोथरे, नर्सिंग महाविद्यालयाचे प्राध्यापक रीमा खान, अमृता पाले, नेहा सरवणकर यांनी मोलाचे सहकार्य केले.



