मुख्य बातमीराजकीय

सार्वजनिक बांधकाम विभागात मनसेचा ठिय्या

अधिकाऱ्यांना फुटला घाम; येत्या चार दिवसांत योग्य माहिती देण्याचे आश्वासन

रत्नागिरी : सार्वजनिक बांधकाम विभागातील अपव्यवहाराबाबत गेली अनेक महिने महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाठपुरावा करत आहे. पण निर्ढावलेले अधिकारी मात्र योग्य कागदपत्र, माहिती देत नव्हते. बुधवारी (१४ ऑगस्ट) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अधिकारीवर्ग तसेच सौ. छाया नाईक (आधिक्षक अभियंता) यांना जाब विचारण्यात आला. तसेच कार्यालयात ठिय्या मांडून जोरदार घोषणा देण्यात आल्या. यानंतर पुढील ४ दिवसात संबंधित योग्य कागदपत्र व माहिती दिली जाईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने देण्यात आले.

रत्नागिरीतील जनतेच्या, स्थानिक तरुणांच्या प्रश्नांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव तत्पर आहे. या प्रसंगी मनसेचे संपर्क अध्यक्ष द. रत्नागिरी जिल्हा मनिष पाथरे यांच्यासह तालुका अध्यक्ष रूपेश जाधव, रस्ते आस्थापना जिल्हा अध्यक्ष अजिंक्य केसरकर, मनविसे जिल्हा अध्यक्ष गुरु प्रसाद, माजी तालुका अध्यक्ष अनिरुद्ध (छोटू) खामकर, उपतालुका अध्यक्ष राजू पाचकुडे, अक्षय चव्हाण, अनंत शिंदे, सुनील पारकर, साहिल वीर, सौरभ गायकवाड, सोम पिलणकर, माजी शहर अध्यक्ष सतीश राणे, ऋषीकेश रसाळ, शक्ती मयेकर, अमोल साळवी, अनिल पारकर, शिल्पाताई कुंभार यांसह अन्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button