वैश्य युवातर्फे ‘राधाकृष्ण श्री २०२४’ जिल्हास्तर स्पर्धा १८ ऑगस्टला
राधाकृष्ण वैश्य मंदिर संस्थेच्या १००व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजन

रत्नागिरी : राधाकृष्ण वैश्य मंदिर संस्थेच्या १०० व्या वर्धापन दिनानिमित्त मानाच्या ‘राधाकृष्ण श्री २०२४’ या जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन वैश्य युवातर्फे करण्यात आले आहे. हे या स्पर्धेचे चौथे वर्ष आहे. राधाकृष्ण मंदिर, बाजारपेठ रत्नागिरी येथे ही स्पर्धा रविवारी (१८ ऑगस्ट) सायंकाळी ६ वाजता सुरू होईल.
रत्नागिरी जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने होणारी ही स्पर्धा चार गटांत घेतली जाईल. किताब विजेत्याला रोख रक्कम ११ हजार व आकर्षक शिल्ड देऊन गौरविण्यात येईल. तसेच प्रत्येक गटांत ५ क्रमांक निवडले जातील. प्रत्येक गटातील पहिल्या विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे २ हजार, १ हजार ५००, १ हजार, ५०० रुपये अशी रोख पारितोषिक व आकर्षक शिल्ड देण्यात येणार आहे. याशिवाय बेस्ट पोझर, व उगवता तारा यांचीही निवड करण्यात येणार आहे. त्यांना रोख रुपये १ हजार व आकर्षक शिल्ड देण्यात येणार आहे.
सर्व स्पर्धकांना रात्रीचे जेवण आयोजकांमार्फत दिले जाणार आहे. रत्नागिरी तालुक्याबाहेरील स्पर्धकांना एकवेळच्या बसचा प्रवासखर्च दिला जाईल. तरी जास्तीतजास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन राधाकृष्ण मंदिराचे अध्यक्ष राजन मलुष्टे, उपाध्यक्ष विरेंद्र वणजू, सेक्रेटरी मकरंद खातू यांनी केले आहे.
इच्छुक सर्व स्पर्धकांनी आपली नावे वेळेत देणे बंधनकारक आहे. १८ ऑगस्टला सायंकाळी ५ वाजता स्पर्धेच्या ठिकाणी हजर राहायचे अनिवार्य असणार आहे. स्पर्धेचे लाईव्ह प्रक्षेपण संपादक हेमंत वणजू हे प्रायोजित करणार आहेत. अधिक माहितीसाठी सदानंद जोशी (८६६८३०६१४८), जितेंद्र नाचणकर, तसेच वैश्य युवाचे स्पर्धा प्रमुख अथर्व शेट्ये (८३२९३६७६४७), सौरभ मलुष्टे, मनोहर दळी, सचिन केसरकर, मुकुल मलुष्टे, सुनील बेंडखळे, कुंतल खातू, वेदांत मलुष्टे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



