मुख्य बातमी

कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेच्या युवाब्रह्मकडून श्रावणाचे स्वागत

रत्नागिरी : कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेच्या अंतर्गत येणाऱ्या युवाब्रह्मतर्फे गोखले भवन नाचणे रोड येथे दीप अमावस्येच्या दिवशी श्रावण स्वागत हा स्वरचित कविता आणि गीत गायनावर बहारदार कार्यक्रम संपन्न झाला.

पाऊस, एकादशी, गुरुपौर्णिमा, श्रावण या विषयाला धरून स्वरचित कविता आणि सदाबहार गाणी या कार्यक्रमातील कलाकारांनी सादर केली. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलाने तसेच गणेश वंदना शाल्मली भावे हिच्या नृत्याने करण्यात आली. स्वरचित कवितांमधून आणि सुरेल अशा गीत गायनांमधून विठ्ठल रखुमाई, पाऊस, निसर्ग, गुरुपौर्णिमा यांचे अतिशय सुंदर वर्णन केले गेले आणि उपस्थित प्रेक्षकांना या कार्यक्रमामुळे श्रावण सरी प्रमाणे आनंद मिळाला. सौ. प्राची रानडे यांच्या सुरेल भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली.

कलाकारांना प्रेक्षकांनी टाळ्या आणि वन्समोअर ने दाद दिली. सौ. निला केळकर, माधवी मुकादम, श्रद्धा जोशी, शमा प्रभुदेसाई, देवदत्त पेंडसे, विलास कुलकर्णी, केतकी, प्राजक्ता दामले, सौ. राधा रानडे, स्वराज्ञ्नी व सावनी सरपोतदार, कौशिकी, अनुजा या आणि इतर कलाकारांनी आपली कला उत्तम सादर केली. तसेच चैतन्य पटवर्धन, प्रसाद पटवर्धन, राघव पटवर्धन यांची वादक म्हणून साथ लाभली.

या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवदत्त पेंडसे आणि कोमल पटवर्धन यांनी उत्तमरित्या पार पाडले. कार्यक्रमाला रवींद्र रानडे, सौ. तेजा मुळ्ये, रवींद्र इनामदार यांचे मार्गदर्शन लाभले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नीलम जोशी, हर्षदा पंडित, काका सरदेसाई, अपूर्वा मुसळे आदी युवाब्रह्मच्या सभासदांनी मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button