मुख्य बातमीशैक्षणिक

युवा महोत्सवात एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाची चमकदार कामगिरी

मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने आयोजन

रत्नागिरी : येथील नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या एस. पी. हेगशेट्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात नुकत्याच झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या ५७ व्या युवा महोत्सवात एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाने चमकदार कामगिरी केली. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची ८ वेगवेगळ्या प्रकारांत विजेतेपद मिळवत अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या दक्षिण रत्नागिरी विभागासाठी ५७ व्या युवा महोत्सवाच्या प्राथमिक फेरीचे आयोजन केले होते. यात सुमारे ५०० विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शवला.

यात एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत ८ वेगवेगळ्या प्रकारांत विजेते पद पटकावले. भारतीय लोकनृत्य प्रकारात तिसरा क्रमांक, वक्तृत्व स्पर्धा (मराठी) आणि कथाकथन (मराठी) या प्रकारात दुसरा क्रमांक, एकपात्री अभिनय (मराठी), माईम, मोनो अक्टिंग (मराठी) आणि स्किट (हिंदी) या चारही प्रकारांत पहिला क्रमांकावर आपले नाव कोरले, तर मेहेंदी डिझाईन प्रकारात तिसरा क्रमांक पटकावला. या विद्यार्थ्यांची निवड २८ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीत मुंबई विद्यापीठात होणाऱ्या अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.

या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये, संचालिका सौ. सीमा हेगशेट्ये, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, मुंबई विद्यापीठाच्या सांस्कृतिक विभागाचे सह समन्वयक आणि हॉटेल मॅनेजमेंट विभागप्रमुख प्रा. ताराचंद ढोबळे यांनी विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या त्यांचे अभिनंदन करून त्यांना अंतिम फेरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button