मुख्य बातमीशैक्षणिक

संगमेश्वर नवनिर्माण महाविद्यालयात महसूल पंधरवडानिमित्त मार्गदर्शन

संगमेश्वर : लोवले येथील नवनिर्माण महाविद्यालयात महसूल पंधरवड्यानिमित्ताने माभळे मंडळ अधिकारी कार्यालयाच्या वतीने विविध दाखले तसेच कामकाजाबाबत माहिती देण्यात आली.

या प्रसंगी मंडळ अधिकारी अमर चाळके, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संजना चव्हाण, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रज्ञा कदम, दिनेश जाधव, तलाठी संदेश घाग, कोतवाल अमर जाधव, प्रा. प्रशांत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाला महसूल विभागाचे ऑन लाइन दाखले, ई-पीक पाणी सुविधा, ई-हक्क प्रणाली, सातबारा अँप, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button