मुख्य बातमीशैक्षणिक

मुंबई विद्यापीठाचा युवा महोत्सव ३ ऑगस्टला एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात रंगणार

रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या ५७ व्या युवा महोत्सवाची प्राथमिक फेरी (झोनल राऊंड) ३ ऑगस्टला येथील एस. पी. हेगशेट्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात होत आहे. यात दक्षिण रत्नागिरीतील २० महाविद्यालयांतील ५०० हून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत, अशी माहिती दक्षिण विभागाचे (साऊथ झोन) समन्वयक प्रा. ताराचंद ढोबळे यांनी दिली.

मुंबई विद्यापीठाचे एकूण १२ झोन असून यातील दक्षिण रत्नागिरी या दहावा झोनमध्ये संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या चार तालुक्यांचा समावेश आहे. या चार तालुक्यांमधील २० महाविद्यालयांतील ५००हून अधिक विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत. हे विद्यार्थी लोकनृत्य, नृत्य, गायन, वादन, अभिनय अशा 42 कला प्रकारांचे सादरीकरण करतील.

विद्यापीठाच्या युवा महोत्सवाची प्राथमिक फेरी (झोनल राऊंड) ३ ऑगस्टला एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात रंगणार असून, अंतिम फेरी २८ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीत मुंबई विद्यापीठात होणार आहे. दक्षिण विभागाचे (साऊथ झोन) सह समन्वयक पदाची जबाबदारी एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयातील हॉटेल मॅनेजमेंट विभागप्रमुख प्रा. ढोबळे सोपविण्यात आली आहे.

विद्यापीठाच्या युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी योग्य नियोजन केले जात असून, त्याची तयारी अंतिम टप्प्यात आल्याचे प्राचार्या डॉ आशा जगदाळे आणि सह समन्वयक प्रा. ताराचंद ढोबळे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button