मुख्य बातमी

वाहतूक पोलिसांना दिला रेनकोटचा आधार

रत्नागिरी : उन्हापावसातून जनतेची सेवा करणाऱ्या वाहतूक पोलिसांचा सहृदयतेने विचार करून रत्नागिरी शिवसेनेच्या महिला शहर संघटक सौ. पूजा दीपक पवार यांनी त्यांच्यासाठी रेनकोटचे वाटप केले.

शिवसेनेचे पालकमंत्री उदय सामंत, सिंधुरत्न योजनेचे निमंत्रित सदस्य किरण सामंत आणि रत्नागिरी शिवसेना शहर प्रमुख बिपीन बंदरकर यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच हा कार्यक्रम घेण्यात आला. उन्हापावसाची पर्वा न करता तासनतास उभे राहून शहराच्या वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करत आपले कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांसाठी काही करावे या उद्देशाने शिवसेना महिला शहर संघटक सौ. पूजा पवार यांनी पोलिसांसाठी रेनकोट उपलब्ध करून दिले. जनतेची सेवा बजावणाऱ्या पोलिसांच्या कार्याला आपल्याकडून छोटीशी मदत करावी या उद्देशाने हे वाटप केल्याचे त्यांनी सांगितले. पालकमंत्री उदय सामंत, शहर प्रमुख बिपीन बंदरकर, महिला शहर संघटक पूजा पवार, शिवसेनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक राजनजी शेट्ये, यांच्या हस्ते रेनकोट वितरण करण्यात आले. समाजातील या उपयोगी परंतु दुर्लक्षित घटकांचा विचार करून पूजा पवार यांनी केलेली ही मदत त्यांच्या सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देत आहे अशा शब्दांत पालकमंत्री उदय सामंत यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. या कार्यक्रमाला रत्नागिरी पंचायत समितीचे माजी सभापती महेश उर्फ बाबू म्हाप, माजी नगराध्यक्ष सुदेश मयेकर, युवा सेना शहर प्रमुख अभिजीत दुडये, तडफदार कार्यकर्ते सौरभ मलुष्टे, दीपक पवार, अंजली सावंत, काव्या कामतेकर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button