कोकण रेल्वे मार्गावर धावणार मंगळुरू जं.-मडगाव जं. ही अनारक्षित मेमू स्पेशल गाडी

रत्नागिरी : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी दूर करण्यासाठी मंगळुरू जं.-मडगाव जं. ही अनारक्षित मेमू स्पेशल गाडी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोकणात येणाऱ्यांची कोकण रेल्वेला मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यासाठी कोकण रेल्वे मार्गावर अनारक्षित मेमो स्पेशल गाडी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गाडी क्रमांक ०७१०७/०७१०८ मडगाव जं. – मंगळुरू जं. – मडगाव जं. मेमू (अनारक्षित) ही गाडी सोडली आहे. विशेष गाडी क्रमांक ०७१०७ मडगाव जं. – मंगळुरू जं. मेमू (अनारक्षित) स्पेशल मडगाव जंक्शन येथून शनिवार, रविवार आणि सोमवार म्हणजेच २०, २१ आणि २२ जुलै रोजी सकाळी ६ वाजता सुटेल. ती मंगळुरू जंक्शनला त्याच दिवशी दुपारी १२.१५ वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक ०७१०८ मंगळुरु जं. – मडगाव जं. मेमू (अनारक्षित) स्पेशल गाडी शनिवार, रविवार आणि सोमवार म्हणजेच २०, २१ आणि २२ जुलैला मंगळुरू जंक्शन येथून दुपारी १२.४० वाजता सुटेल. ही गाडी मडगाव जंक्शनला त्याचदिवशी रात्री ७ वाजता पोहचेल.
ही गाडी कानाकोना, कारवार, हरवाडा, अंकोला, गोकर्ण रोड, मिरजन, कुमटा, होन्नावर, मानकी, मुर्डेश्वर, भटकळ, शिरूर, मुकांबिका रोड बाइंदूर, बिजूर, सेनापुरा, कुंदापुरा, बारकुर, उडुपी, मुल्की, सुरथकल आणि थ्रोक स्टेशन येथे थांबेल.



