मुख्य बातमी

गुहागर तालुक्यात १ लाख ७० हजारांचे नुकसान

गुहागर : तालुक्यात सतत पडत असणाऱ्या पावसामुळे सुमारे पावणे दोन लाखांच्या नुकसानीची नोंद करण्यात आली असून, एक महिला किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे. सुवर्णा शांताराम खांबे असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.

गेले काही काही गुहागर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरू आहे. जिल्ह्यातील जगबुडी (ता. खेड) आणि कोदवली (ता. राजापूर) या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. गुहागर तालुक्यातही मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. मौजे पोमेंडी (ता. गुहागर) येथील घडशी वाडीतील श्रीमती माधुरी मधुकर घडशी यांच्या राहत्या घराचे छप्पर कोसळले असून यात त्यांचे अंदाजे २५ हजारांचे नुकसान झाले आहे.

मौजे आरे येथील मोहित प्रसाद देवकर यांच्या राहत्या घराच्या पडवीवर माडाचे झाड पडून त्यांचे १५ हजारांचे नुकसान झाले आहे. मौजे आबलोली येथील बौद्धवाडी-कोष्टी वाडी स्मशानभूमीची संरक्षक भिंत कोसळल्याने सुमारे ३० हजारांच्या नुकसानीची नोंद करण्यात आली आहे. तसेच मौजे पांगारी तर्फे वेळंब येथे सुवर्णा शांताराम खांबे यांच्या राहत्या घराचे पूर्णत: नुकसान झाले असून, यात सुवर्णा खांबे यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. श्रीमती खांबे यांच्या सुमारे १ लाखाच्या नुकसानीची नोंद करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button