मुख्य बातमी

सोशल मीडियावर रत्नागिरी पोलिसांचा २४ तास वॉच

सायबर पोलीस ठाणे व सोशल मीडिया लॅबमार्फत २४x७ निगराणी

रत्नागिरी : अलीकडे विशाळगड (जि. कोल्हापूर) येथील घटनांच्या अनुषंगाने सोशल मीडियावर पसरत असलेल्या वेगवेगळ्या पोस्टच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह दृश्य, फोटो, व्हिडिओ तसेच अफवा न पसरविण्याबाबत आवाहन रत्नागिरी पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

सोशल मीडियावर सायबर पोलीस ठाणे व सोशल मीडिया लॅब यांच्यामार्फत २४x७ निगराणी ठेवण्यात येत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणत्याही धर्माबद्दल आक्षेपार्ह चित्र, पोस्ट, अफवा, चुकीचे संदेश अगर आक्षेपार्ह संदेश व व्हिडीओ प्रसारित केल्यास रत्नागिरी पोलीस दलाकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये अथवा बळी पडू नये. सोशल मीडियावर कोणत्याही धर्माबद्दल अफवा पसरविल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल याची दक्षता घ्यावी.

फेसबुक, व्हाॅटसॲप, ट्विटर (एक्स), इन्ट्राग्राम, यु-ट्युबच्या माध्यमातून कोणत्याही धर्माबद्दल आक्षेपार्ह चित्र, पोस्ट, अफवा, चुकीचे संदेश आक्षेपार्ह संदेश अथवा व्हिडीओ प्रसारित करण्यात येऊ नयेत. सर्व जाती, धर्माच्या संदर्भात आक्षेपार्ह घटनांवर कठोर कारवाई करण्यात येणार व अश्या घटनांवर रत्नागिरी पोलीस दलातर्फे कडक धोरण स्वीकारले जाईल. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जातीय सलोखा राखण्यामध्ये पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन रत्नागिरी पोलीस दलाकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button