Uncategorizedमुख्य बातमी

भोगवे (किल्ले निवती), वेंगुर्ला येथील मच्छिमारांना सागरी सुरक्षेचे प्रात्यक्षिक

सिंधुदुर्ग : मच्छिमारी हा व्यवसाय खूप जोखमीचा आहे. वर्षानुवर्षे मासेमारी करताना मच्छिमारांना समुद्रामध्ये विविध आपत्तीना तोंड द्यावे लागते. हृदयविकाराचा झटका येणे, बोटीवरून पाण्यात पडून बुडणे, विजेचा धक्का लागणे आदी आपत्तीमध्ये प्राथमिक उपचार काय करावे या बद्दलची शास्त्रीय माहिती मच्छिमारांना असणे गरजेचे आहे. जेणेकरून संभाव्य धोक्यामुळे होणारे नुकसान टाळता येते अथवा कमी करता येते. याच हेतूने भोगवे (किल्ले निवती), वेंगुर्ला येथील मच्छिमारांना रिलायन्स फाउंडेशन, आणि राज्य शासनाचा नागरी संरक्षण दल (सिंधुदुर्ग) यांच्या संयुक्त विद्यमाने सागरी सुरक्षेचे प्रशिक्षण देण्यात आले.
या प्रसंगी नागरी संरक्षण दल, सिंधुदुर्ग कार्यालयाचे सहाय्यक उपनियंत्रक राजेंद्र लाड, रिलायन्स फाउंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक राजेश कांबळे, गणपत गावडे उपस्थित होते. समुद्रामध्ये मच्छिमारांना हृदयविकाराचा झटका आल्यास, मच्छिमार पाण्यात बुडाल्यास, विजेचा धक्का लागल्यास, साप चावल्यास मासेमारांना हाताळायच्या विविध शास्त्रीय पद्धती यावेळी प्रात्यक्षिकासहित समजावून सांगण्यात आल्या. हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णाला कृत्रिम श्वासोश्वासवासाद्वारे (CPR) दिलासा कसा द्यावा याचे प्रात्यक्षिक करून दाखविले तसेच मच्छिमारांना प्राथमिक उपचार कसे द्यावेत या बद्दलही सविस्तर माहिती देण्यात आली. मच्छिमार महिलांना गॅस सिलेंडरमधूण गॅस गळती होत असल्यास काय करावे, तसेच शॉक लागल्यास काय काळजी घ्यावी याची माहिती राजेंद्र लाड यांनी दिली. कार्यक्रमास मच्छिमार बंधू-भगिनींचा चांगला सहभाग लाभला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button