नारायण राणे यांच्या प्रचारासाठी नीलम राणे मैदानात

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी सौ. नीलम राणे मैदानात उतरल्या असून, नुकताच त्यांनी संगमेश्वर दौरा करत महिलांना संबोधित केले, तसेच नारायणराव राणे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.
महायुतीचे उमेदवार म्हणून राणे यांचे नाव जाहीर झाल्यानंतर महिला मोर्चाच्या पदाधिकारी सक्रिय झाल्या असून संगमेश्वर दौऱ्यात सौ. नीलम राणे यांच्यासोबत सौ. माधवी माने व भाजपा प्रदेश उपाध्यक्षा प्रा. वर्षा भोसले, भाजप जिल्हाध्यक्षा सौ. सुजाता साळवी, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख सौ. शिल्पा सुर्वे, प्रदेश सचिव सौ. शिल्पा मराठे, दीपलक्ष्मी पडते, सौ. अपर्णा पाटील, सौ. संगीता जाधव, सौ. नुपूरा मुळ्ये, सौ. दीपिका जोशी, तालुकाध्यक्षा सौ. शीतल दिंडे, सौ. स्नेहा फाटक आदी महिला पदाधिकारी सहभागी झाल्या होत्या.
आंबेड (बु.) येथे उन्मेष मुळ्ये यांच्या घरी महिलांची बैठक झाली. त्यानंतर सोनगिरी, मुस्लिम मोहल्ल्यात महिलांशी संवाद साधला. त्यानंतर आरवली, भुवडवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवीण भुवड यांच्या निवासस्थानी, माखजन, बौद्धवाडी येथील माता रमाई संघातील महिलांना तसेच लोवले येथे प्रियंका साळवी यांच्या घरी महिलांना मतदान करण्याचे आवाहन केले. त्यानंतर आंबव सुतारवाडी येथे सौ. माधवी अधटराव यांनी आयोजित केलेल्या महिला बैठकीत आपली भूमिका मांडून उद्योजक सुखदेव जाधव यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
संगमेश्वर (द.) तालुकाध्यक्ष यांच्या हातिव येथील निवासस्थानी महिलांना मार्गदर्शन केले. तसेच भाजपचे नेते, महायुतीचे लोकसभेचे उमेदवार नारायण राणे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.
यावेळी भाजप महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौ. वर्षा ढेकणे, भाजयुमो जिल्हा सरचिटणीस सौ. श्रद्धा इंदुलकर, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा अक्लिमा परदेशी, नगराध्यक्षा सौ. मृणाल शेट्ये, नगरसेविका सौ. रेश्मा किर्वे, सौ. मनस्वी आंबेकर, भाजपच्या जिल्हा चिटणीस सौ. कोमल रहाटे, सौ. शीतल पंडित, सौ. स्वाती राजवाडे, जिल्हा सोशल मिडिया सहसंयोजिका शिवानी सावंत, अॅड. स्वाती गोडे, सौ. सरिता आंबेकर, उपाध्यक्षा सौ. श्रेया मोहिते, सौ. सुमन झगडे, सौ. मुग्धा भिडे, सौ. समृद्धी वेलवणकर, सौ. श्रीयांका गुरव, सौ. आराध्या निकम, सौ. वैष्णवी चव्हाण, सौ. प्राजक्ता भुवड, सौ. सविता पवार, सौ. श्वेता सुरेश कांगणे, सौ. रूपाली कदम, सौ. विशाखा कदम, सौ. सुशीला कातकर, सौ. अनुश्री पाटणे, ज्येष्ठ भाजप कार्यकर्त्या अमिता पाटणे, सौ. अपर्णा शिगवण, सौ. फराह मुजावर, सौ. योगिता फटकरे, सौ. रक्षिता धामणस्कर आदी महिला पदाधिकाऱ्यांसह चिपळूण-संगमेश्वर विधानसभा निवडणूक प्रमुख प्रमोद अधटराव, तालुकाध्यक्ष रूपेश कदम, तालुका उपाध्यक्ष राजेश आंबेकर, प्रशांत रानडे, महेश (बावा) जड्यार, गणेश साठे, सोशल मिडिया जिल्हा संयोजक अमोल गायकर, वॉररूम प्रमुख प्रसाद भिडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.



