मुख्य बातमी

रत्नागिरीत ‘सुंदर माझी बाग’ स्पर्धेचे आयोजन

रत्नागिरी : रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी आणि वृक्षवल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने हौशी बागकाम प्रेमींसाठी ‘सुंदर माझी बाग’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १२ मे २०२४ ही शेवटची तारीख आहे. दोन्ही विभागातून प्रत्येकी ३ विजेते निवडले जाणार असून, त्यांना आकर्षक बक्षीस देऊन सन्मानित केले जाणार आहे.
ही स्पर्धा टेरेस/बाल्कनी गार्डन आणि आऊटडोअर गार्डन या दोन विभागात घेतली जाणार असून, बागेतील झाडांचे आरोग्य, क्रिएटिव्हिटी आणि एकूण मांडणी, तसेच वैविध्य आणि शाश्वत दृष्टीकोन(Sustainable approach) हे परीक्षणाचे निकष असणार आहेत. बागकामाची आवड असलेल्या १२ वर्षांवरील सर्वांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. ही स्पर्धा रत्नागिरी जिल्ह्यासाठी मर्यादित आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बागेचा १ मिनिटांचा एक व्हिडिओ, बागेसोबत एक सेल्फी, आणि ‘बागकाम म्हणजे माझ्यासाठी….’ या विषयी जास्तीत जास्त १० ओळींचा राइट अप द्यायचा आहे.
या स्पर्धेत रत्नागिरीतील जास्तीत जास्त बागप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष श्रीकांत भुर्के, सचिव प्रमोद कुलकर्णी, खजिनदार प्रकल्प आराध्ये आणि वृक्षवल्लीच्या माधुरी कळंबटे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button