मुख्य बातमीसाहित्य-कला

रंगशाळा विद्यालयातर्फे फिल्म मेकिंग कार्यशाळा

रत्नागिरी : ज्या नोकरदार, व्यावसायिकांना आपले काम सांभाळून आपली शूटिंगची आवड, छंद जोपासयचा आहे त्यांच्यासाठी रंगशाळा सिनेनाट्य विद्यालयातर्फे फिल्म मेकिंग कार्यशाळेचे आयोजन केले आहे. ही कार्यशाळा एप्रिल महिन्याच्या च्या सर्व रविवारी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत रंगशाळा विद्यालयात होणार आहे.
ग्रामीण भागात किंवा रत्नागिरीसारख्या निमशहरी भागात अनेक कलाकार शूटिंगसाठी धडपडत असतात. त्यामध्ये नोकरदार, व्यावसायिक यांचाही समावेश आहे. आपली कामे सांभाळून आपली शूटिंगची आवड, छंद जोपासण्याबरोबरच त्यांना शूटिंगच्या नवीन तंत्रज्ञान, नव्या कल्पना शिकायच्या असतात. तसेच शूटिंगचे सर्व साहित्य स्वतः हाताळून पाहायचे असते. या सगळ्याचा विचार करून रंगशाळा सिनेनाट्य विद्यालयाने सिनेशाळा हा उपक्रम कार्यशाळेच्या रूपात सुरू केला आहे. ही कार्यशाळा खास ग्रामीण आणि निमशहरी भागात शूटिंगसाठी स्ट्रगल करणाऱ्या, धडपडणाऱ्या कलाकारांसाठी डिझाईन केली आहे. शूटिंगसाठी लागणारे सर्व साहित्य म्हणजेच प्रोफेशनल शूटिंग कॅमेरा, लाईट्स, गिंबल हे रंगशाळा विद्यालयाचे असणार आहेत. या कार्यशाळेत प्लॉट डेव्हलपमेंट स्क्रीनप्ले आदी प्री-प्रोडक्शनची संपूर्ण तयारी कशी करायची याचे मार्गदर्शन केले जाईल. अधिक महितीसाठी रंगशाळा, कोकणचे सिनेनाट्य विद्यालय, मेहता क्लिनिक शेजारी, नाचणे रोड, रत्नागिरी येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कार्यशाळेविषयी :
दिवस : एप्रिल महिन्याचे सर्व रविवार
वेळ : सकाळी ११ ते सायंकाळी ५
स्थळ : रंगशाळा, कोकणचे सिनेनाट्य विद्यालय, मेहता क्लिनिक शेजारी, नाचणे रोड, रत्नागिरी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button