शैक्षणिक
नवनिर्माण महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

रत्नागिरी : येथील नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या नवनिर्माण कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला.
या वेळी प्राचार्या डॉ. सौ. आशा जगदाळे, कनिष्ठ महाविद्यालय विभागप्रमुख प्रा. सुकुमार शिंदे, प्रा. गौसिया बुडीये, प्रा. मोहिनी मस्के उपस्थित होत्या. मान्यवरांचे स्वागत केल्यानंतर मार्गदर्शन करताना बोलताना प्रा. शिंदे यांनी मानवी जीवनात विज्ञान आणि संशोधन याचे महत्त्व सांगून तंत्रज्ञानातील बदल, कृत्रिम बुद्धिमत्ता यावर मार्गदर्शन केले. प्राचार्या डॉ. सौ. जगदाळे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्त्व विशद केले. अकरावी विज्ञान शाखेतील निखात मालगुंडकर आणि हिना अल्वी या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.


