सावरकर नाट्यगृहात उद्यापासून नमन महोत्सव

रत्नागिरी : सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात ६ ते ८ मार्च या कालावधीत नमन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत होईल.
य महोत्सवात उद्या (ता. ६) झरेवाडी नाट्य नमन मंडळ (मंदरुळ, ता. राजापूर), बळीवंश कलामंच (कांदिवली, मुंबई), श्री ग्रामदेवता लोककला नाट्य नमन मंडळ (माभोळे, जाधववाडी, संगमेश्वर) हे नमन सादर करतील. गुरुवारी (ता. ७) साई श्रद्धा कलापथक कानसे ग्रुप (चिखली, ता. गुहागर), नवलाईदेवी नमन मंडळ (कुर्णे, पयडेवाडी, ता. लांजा), नवविकास नमन मंडळ (अबिटगाव, दत्तवाडी, ता. चिपळूण) यांचा नमनाचा कार्यक्रम होईल. शुक्रवारी (ता. ८ मार्च) रोजी आई जीवदानी कला फाऊंडेशन नाट्य नमन मंडळ (वीर, ता. चिपळूण), रवळनाथ रिमिक्स नमन मंडळ लयभारी (रत्नागिरी), सिद्धिविनायक नाट्य नमन मंडळ (मंदरुळ, गणेशवाडी, ता. राजापूर) हे नमन सादर करतील.
जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांनी नमन महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे व संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.
महोत्सवाविषयी
दिवस : ६ ते ८ मार्च २०२४
स्थळ : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृह, मारूती मंदिर, रत्नागिरी.
वेळ : सायंकाळी ७ ते रात्री १०



