रत्नागिरी जिल्हा वृत्तशैक्षणिक

तांबे-रायमाने युवा संशोधक अभ्यासवृत्तीसाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन

अर्ज करण्याची अंतिम तारीख २९ फेब्रुवारी २०२४

रत्नागिरी : पुणे येथील साधना साप्ताहिकाच्या वतीने तांबे-रायमाने युवा संशोधक अभ्यासवृत्तीसाठी प्रस्ताव पाठविण्यासाठी आवाहन करण्यात आले असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख २९ फेब्रुवारी २०२४ आहे. साधना सप्ताहिकातर्फे गेली तीन वर्षे अभ्यासवृत्ती दिली जात आहेत.
एप्रिल ते सप्टेंबर २०२४ या सहा महिन्यांत शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, स्त्री-पुरुष विषमता, भटके-विमुक्त, आदिवासी, मुस्लिम समाज सुधारणा, सामाजिक चळवळी व आंदोलने, बदलते ग्रामीण वास्तव, रोजगार, शेती आणि शेतकरी, शासकीय योजनांची अंमलबजावणी यापैकी कोणत्याही एका विषयावर अभ्यास करून तो अभ्यास लिखित, ऑडिओ किंवा व्हिडिओ स्वरूपात सादर करणे आवश्यक आहे. त्यासाठी या विषयातील कोणतेही एक लहान युनिट घेऊन अभ्यास व फिल्ड व्हिजिट यांवर आधारित रिपोर्ताज किंवा दीर्घ लेख तयार करायचा आहे. २९ फेब्रुवारीपर्यंत आलेल्या अर्जांची छाननी करून त्यातील ते त्यासोबतच्या टिपणसह त्या-त्या विषयांच्या तज्ज्ञांकडे पाठविले जातील. त्यानंतर आवश्यकतेनुसार अंतिम फेरीतील अर्जदारांच्या मुलाखती प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन घेतल्या जाणार असून अंतिम निवड झालेल्या पाच तरुण-तरुणींची नावे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केली जाणार आहेत. त्यानंतर प्रत्येक महिन्यात झालेल्या अभ्यासाचा आढावा घेऊन पुढील हप्ता दिल जाईल. जानेवारी २०२५ मध्ये ते अभ्यास-संशोधन साप्ताहिक साधनामध्ये किंवा कर्तव्य साधना डिजिटल पोर्टलवर प्रसिद्ध केले जाईल.
पाच तरुण-तरुणींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची अभ्यासवृत्ती दिली जाईल. त्यासाठी २९ फेब्रुवारी २०२४ पूर्वी ज्यांचे वय ३५ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी आहे त्यांना या अभ्यासवृत्तीसाठी अर्ज करता येणार आहे. अर्जदाराने स्वत:चे पूर्ण नाव, पूर्ण पत्ता (ई-मेल व फोन नंबरसह), शिक्षण, जन्मतारीख, नोकरी/व्यवसाय करीत असल्यास कुठे व कधीपासून, यापूर्वी केलेले अभ्यास/संशोधन/लेखन हे सर्व तपशील एक ते दोन पानांत बसतील अशा पद्धतीने टाईप करून घ्यायचे आहेत. सोबतच कोणत्या एक लहान घटकावर का व कसा अभ्यास करण्याची इच्छा आहे, हे सांगणारा पाचशे ते हजार शब्दांपर्यंतचा प्रस्ताव जोडून तो २९ फेब्रुवारीपर्यंत अर्ज आणि त्यासोबतच प्रस्ताव मेलद्वारे किंवा पोस्टाने साधना सप्ताहिकाच्या कार्यालयीन पत्त्यावर पाठवावा.

अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : संपादक, साधना साप्ताहिक, ४३१, शनिवार पेठ, पुणे ४११ ०३०
फोन नंबर : (०२०) २४४५१७२४
मोबाईल नंबर : ७०२८२५७७५७
ई-मेल आयडी : weeklysadhana@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button