मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्तशैक्षणिक

‘नवनिर्माण हाय’मध्ये सीबीएससी बोर्डाच्या दहावी-बारावीची बैठक व्यवस्था

रत्नागिरी : सीबीएससी दिल्ली बोर्ड माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र लेखी परीक्षा १५ फेब्रुवारी ते २ एप्रिल २०२४ या कालावधीत होणार आहे. ही परीक्षा एमआयडीसीतील एस. एम. जोशी विद्यानिकेतनमधील नवनिर्माण हाय इंग्लिश मिडियम स्कूल या शाळेत होणार असून, या परीक्षा केंद्राचे हे आठवे वर्ष आहे. या केंद्राचा क्रमांक ८२२३२४ असा आहे.

या परीक्षेसाठी नवनिर्माण हायस्कूल,  पोद्दार इंटरनॅशनल स्कूल,  जिंदाल विद्यामंदिर, एस. व्ही. एम स्कूल,  पी. एस. बने या शाळेतील विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था केली आहे. २० फेब्रुवारीला दहावीचा पहिला पेपर मराठी विषयाचा होईल. या परीक्षेसाठी सर्व शाळांमधील मिळून दहावीचे एकूण १४१, तर बारावीचे २९ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.

विद्यार्थ्यांना १७ फेब्रुवारी दुपारी १ ते २ या वेळेत बैठक व्यवस्था पहायला मिळेल. परीक्षेवेळी विद्यार्थ्यांनी केंद्रावर सकाळी ९.१५ ते ९.२० पर्यंत उपस्थित राहणे आवश्यक आहे. बोर्डाच्या नियमानुसार सकाळी १० वाजल्यानंतर कुठल्याही विद्यार्थ्याला आत प्रवेश देण्यात येणार नाही. संबंधित पालक व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये, संचालिका सौ. सीमा हेगशेट्ये, प्राचार्या सौ. नजमा मुजावर यांनी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button