शैक्षणिक

बारावी परीक्षेसाठी ‘नवनिर्माण’मधील बैठक व्यवस्था

रत्नागिरी : कोकण बोर्डाच्या फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक (बारावी) परीक्षेसाठी येथील नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालयात रत्नागिरी-४ या नावाने परीक्षेचे केंद्र असून ६१६ हा या केंद्राचा क्रमांक आहे.

बारावीच्या लेखी परीक्षेसाठी कला शाखेच्या २९८ विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. रत्नागिरी-४ (६१६) W ०१०२९५ ते W ०१०५९४ पर्यंत बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. दिनांक २१ फेब्रुवारीला सकाळी इंग्रजी, २२ फेब्रुवारीला सकाळी हिंदी, २३ फेब्रुवारीला सकाळी मराठी आणि दुपारी उर्दू, २४ फेब्रुवारीला सकाळी संस्कृत, २९ फेब्रुवारीला दुपारी राज्यशास्त्र, ५ मार्चला सकाळी सहकार, ९ मार्चला दुपारी अर्थशास्त्र, १३ मार्चला दुपारी मानसशास्त्र, १५ मार्चला दुपारी भूगोल, १६ मार्चला दुपारी इतिहास, १९ मार्चला सकाळी समाजशास्त्र या विषयांची परीक्षा होईल.

विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रवेशपत्रावरील विषय, वेळ व दिनांकानुसार परीक्षेसाठी उपस्थित राहावे. रत्नागिरी-४ या केंद्रावरील बैठक व्यवस्थेसंदर्भात अधिक माहितीसाठी ९४२०२५०९७७ या क्रमांकावर सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन केंद्रसंचालक सुकुमार शिंदे आणि प्राचार्या डॉ. आशा जगदाळे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button