रत्नागिरी जिल्हा वृत्त

अमेरिकास्थित जोडप्याची मातृमंदिला भेट

येथील सामाजिक उपक्रमांत सहभागाची मनिषा

मागील काही वर्ष इंग्लंड व आता अमेरिकेत राहत असलेले मकरंद पेंडसे व डॉ. वैशाली वेलणकर यांनी काल व आज मातृमंदिरच्या सर्व उपक्रमांना भेट देऊन काम समजून घेतलं.

मकरंद हे water Management क्षेत्रात काम करत असून भारतात असताना युसूफ मेहर अली सेंटर सोबत काम करत होते. डॉ. वैशाली या जेष्ठ आर्किओलॉजिस्ट आहेत.

यावर्षी भारतात आल्यावर मातृमंदिर ला भेट द्यायचीच हे खूप आधीच ठरवून त्याप्रमाणे त्यांनी कालची भेट दिली.
‘मातृमंदिर च्या उपक्रमात शक्य ती मदत करायला आम्हाला आवडेल व भविष्यात मातृमंदीरसोबत जोडून राहू’ असं त्यांनी सांगितले.

‘विशेषतः गोकुळसाठी काही मूलभूत मदत करण्याचा विचार करत आहोत पण तोपर्यंत दरमहीना काही आर्थिक मदत पाठवत राहू’ असंही त्यांनी सांगितलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button