रत्नागिरी जिल्हा वृत्त
‘जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन २०२२’ या पुस्तकाचे प्रकाशन

आज रत्नागिरी येथे जिल्हा सांख्यिकी विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या ‘जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन २०२२’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्याचे उद्योगमंत्री आणि रायगड – रत्नागिरी जिल्ह्यांचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी, आमदार योगेश कदम, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, जिल्हाधिकारी व सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.



