सोलकडी : दावोस ते फीयॉस

बाबुराव रोखठोके
(श्रीराम टॉकीज समोरच्या कॅन्टीनमधील तरी.. मारलेली लाल भडक कटाची मिसळ म्हणजे तुफान लोकप्रिय, येथील ठरावीक खवैयांची दिवसाचीसुरवात या मिसळनेच होते.अनेकदिवस बाहेर असलेला पांडू आज मिसळ खायला आला आणि)
राजेश : ( मिटक्या मारत मिसळ खाता खाता).. पांडू .. अरे बरेच दिवसाने दिसतो आहेस? काय परदेशात गेला होतास की काय? सायबाबरोबर!
पांडू : तुलारे काय माहित ? अगदी मनकवडाच आहेस!… अरे आपल्या कोणते नशिबात ! पण सायबांच्या बरोबर चान्स मिळाला आणि चक्कस्वित्झर्लंडची ट्रिप झाली.. आऽऽहाऽऽऽ काय तो निसर्ग आणि काय ते सौदर्य.. पहाटेला सफेद बर्फावर चमकणारे सोनेरी सुर्यकिरणाचे दर्शन आयूष्यात एकदा घ्यावेच ..स्वर्ग यापक्षे वेगळा काय असणार? निसर्ग काय आणि माणूस काय ?सारेच सौदर्याच्या परमोच्च पातळीवरील…
राजेश : अरेऽऽऽऽ काय बाबाठीक आहेस ना? की अजून त्या स्त्झिर्र्लडलाच आहेस… बर्फावरुन समुद्राच्या किनारी उतरुन दे जहाज.. एकदम स्वित्झर्र्लड कारे बाबा? आणि अशा ठिकाणी साहेब तुला बरोबरघेऊन गेले. ( तोंडावरहसू दाबतच)
पांडू : दावोसला गेलो होतो दावोसला? सीएम साहेबांच्या सोबत , मी साहेबांच्या मागे पण , काय सांगू रुबाब तेथे … एक एक लय भारी आयटम राव?…
राजेश ; म्हणजे? कसले आयटम…
पांडू : नाय सुधारनार… तुमी कवा बी नाय सुधारनार… कोठे इंदराचा एरावत आणि कोठे रामभट्टाची तट्टाणी!! तेच खर! आता तु बघच सारा कोकण एकदम उद्योगमय होणार! लाखोंचे रोजगार… तुला सांगतो.. सायबांनी अशी काय डोक्यॅलीटी लढविली आहे ना! की तोंडात बोटच काय ? सारे विरोधकांना तोंडात पाय घालायची पाळी येणाराय!
राजेश : काय बोलतोस? अरे असे काय त्या दावोस मध्ये घबाड सापडलं बाबा…रात्रीच्या रंगेली दुनियेसाठी दाओस जगात प्रसिध्द आहे. आंतरराष्ट्रीय मल्टीनॅनल कंपन्यांच्या वार्षिक बैठका खास तेथे होतात. लॅन्डसवेसर नदीच्या काठावरील स्वित्झर्लडमधील हे गाव एैयाशी आणि रंगील्या रात्रीसाठी फार प्रसिध्द आहे. येथे गेल्यावर कोणाचाच काय तुझा पण रुबाबच असणार मित्रा.
पांडू : तु पण त्या मुर्खांसारखे बरळू नकोस.. या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला शिंदे सरकारची कावीळ झाली आहे. कोणतही चांगले काम करायला गेले की यांना त्यात वाईटच दिसते. अरे तो रावत्या ओरडत रहातो दिवसभर आमचे प्रकल्प पळविले. आमचे प्रकल्प पळविले आणि आता खास प्रकल्प आणायला गेले तर म्हणे एैयांशी करायला गेले. यांच्या तोंडाला न लागणेच बरे!
राजेश : नक्की खरं कायरे त्या शहाजी महाराजांनी आणि मोदी बाबांनी आपले वेदांत फॉक्सफॉन, एअरबस, ड्रग्ज पार्क हे प्रकल्प नाकासमोरुन पळवून नेले गुजरातला. लाखो कोटीची गुंतवणूक आणि काही लाखांचे रोजगार मिळवून देणारेहे प्रकल्प होते. तुला अगदी आतल्या गोटातील माहिती असणार.
पांडू : तुला म्हणूनच सांगतो. आदीत्य ठाकरे, अजीत दादा, संजय राऊत हे सरकारमधीलच लोक त्यांना तर सारेच इतंभूत माहीत आहे. अधिकार्यांना तरसारी माहिती असतेच आणि कधी कोणाचे सरकार येईल याचा काय भरवसा? त्यामुळे ते सर्वच पक्षाना सांभाळून असतात. ते बोलतात त्यात तथ्य असणारच. आता यात या लोकांचे काहीच चालत नाही. इकडे आड आणि तीकडे विहीर अशी परिस्थिती. दिल्लीतून फतवा निघाला की गेल्या माना खाली अशी फार बिकटता आली आहे या राज्यात. ह्यावर मात करण्यासाठी तर दाओसचा मेगा प्लॅन केला. यात पंतांनी पुन्हा साहेबांचा गेमच केला.
राजेश : काय बोलतोस काय?अरे यांच्या जीवावर यांना सत्ता मिळाली आणि यांची एवढी मिजास कशी काय सहन करतात? आता तर राऊतांनी पार पोलखोलच केली. यातं न्यूएज क्लिनटेक सोल्यूशन, फेरो अलॉय, राजुरीस्टील आणि महिंद्रा या कंपन्या तर भारतात चंद्रपूर, औरंगाबाद आणि जालना शहरात नोंदलेल्या भारतातल्याच त्यांचे प्रकल्प आणण्यासाठी आणि करारासाठी दाओसला गेल्याचे सारे ओमफस झालेचे वृत्त प्रसिध्द झाले आहे.
पांडू : तुला सांगतो मित्रा या लोकांची फार तळमळ आहे. काही आपल्या कालावधीत भरभक्कम उभ करण्याची त्यासाठी हे धडपडत असतात. मात्र लगाम दिल्लीच्या हाती आहेत. ते कधी ओढतील याची काहीच कल्पना नाही. आणि न्यायालयाचा मोठा लगाम तर सारेच पहात आहात. ,साहेब म्हणत होते. स्टरलाईटच्या जागी एक 500-1000 कोटीचा प्रकल्प किमान आणायचाच. पण हे सारे असे होते.
राजेश : अरे तु इतका सेन्सीटीव्ह होऊ नको.. राजकारणात हे असे चालायचेच.. पण तुझ्या चेहर्यावर मात्र स्विसग्लो चमकत आहे बर… चल घेघे आणखी एक मिसळ माझ्याकडून….



