मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्त

मायदेशच्या रचनात्मक तांत्रिक आणि आर्थिक परिस-स्पर्शातून रत्नागिरी जिल्हा नगरवाचनालयाचा चेहरा मोहरा बदलणार – ॲड. दीपक पटवर्धन.

रत्नागिरी – रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या इमारतीची पुनर्बांधणी सुरू आहे. तळमजल्याचे काम अंतिम टप्प्यात आहे, तर सभागृहाचे काम प्रगतीपथावर आहे. दुसऱ्या मजल्याचे काम बाकी आहे. १२००० चौ. फुटाचा एफ. एस. आय. वापरून दुमजली बांधकामाची परवानगी वाचनालयाला प्राप्त आहे. आजपर्यंत १ कोटी ५० लाखांच्या आसपास काम झाले आहे. मात्र प्रोजेक्ट पूर्ण होण्यासाठी अधिकच्या निधीची आवश्यकता होती. त्यासाठी विविध स्तरावर संपर्क, संवाद सुरू होता. याच प्रक्रियेत पुणे स्थित श्री. अरुण जोशी यांचा संपर्क झाला. त्यांनी वाचनालयाची माहिती घेतली, तपशीलवार चर्चा केली. त्यांनी स्वतः ‘मायदेश फाऊंडेशन’ निर्माण केलय. स्वकष्टार्जित निधी वापरून जुन्या ऐतिहासिक संस्था, कलात्मक तसेच शैक्षणिक, राष्ट्रवादाशी संलग्न विषय या क्षेत्रात मायदेश फाऊंडेशनच्या माध्यमातून सहकार्य करतात, सहभागातून संपूर्ण प्रोजेक्ट विकसित करतात. भारताचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभव टिकून ठेवत त्यात नाविन्य आणणं, नूतनीकरण यासाठी मायदेश फाऊंडेशन समर्पित आहे.

 राष्ट्रीय वारसा ठरतील अशा संस्थांसाठी रचनात्मक कार्य.

भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे चे नूतनीकरण, स्वा. सावरकर सेवा केंद्र विलेपार्ले हे नव्या बहुआगामी स्वरूपात मायदेशने विकसित केले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांचे नूतनीकरण, विद्यार्थ्यांसाठी संगणक सुविधा पुरवणे, पेशवेकालीन शंकर महादेव मंदिराचा जीर्णोद्धार इत्यादी महत्त्वाच्या राष्ट्रीय ऐतिहासिक मानल्या जाणाऱ्या प्रोजेक्टवर मायदेशने भरभरून काम करून आज हे सर्व प्रोजेक्ट अद्ययावत स्वरूपात उभे केले आहेत.

प्रथितयश, यशस्वी, समर्पित संचालक मंडळ

मायदेश फाऊंडेशनच्या संचालक मंडळावर अत्यंत प्रथितयश व्यावसायिक असामी असून संपूर्ण संचालक मंडळ इतिहास, कला, शिक्षण या विषयासाठी समर्पित होऊन काम करते . मायदेश फाऊंडेशन बरोबर संपर्क झाला, श्री. अरुण जोशी तसेच संचालक मंडळ सदस्य यांचे बरोबर चर्चा झाली. त्यांनी माहिती घेऊन वाचनालयाच्या पुनर्बांधणीसाठी एक १ कोटी 50 लाख रक्कम खर्च करण्याचे मान्य केले.

प्रदिर्घ परंपरा असणारे वाचनालय..अद्ययावत करण्याचा संकल्प

वाचनालयात डिजिटल लायब्ररी मायदेश डिजिटल लायब्ररी नावाने उभी करणे, दुर्मिळ पुस्तकांचे डिजिटलायझेशन, वाचनालयात होणाऱ्या सभागृहाचे संपूर्ण अद्ययावत करने, स्वा. सावरकर कम्युनिटी सेंटर उभारणी, दुसऱ्या मजल्यावर शेड उभारून त्यावर सोलर पॅनल लावून संपूर्ण वाचनालय सोलर पॉवरवर नेणे, वाचनालयात लीफ्ट लावणे, वाचनालयाबाहेरच्या जागेचे सुशोभीकरण करणे इत्यादी रचनात्मक कामे करतानाच वाचनालयाच्या विकासासाठी मार्गदर्शन आणि तांत्रिक सुविधा पुरवण्याचे महत्त्वपूर्ण काम ‘मायदेश फाऊंडेशन’ करणार आहे.

 संपूर्ण प्रोजेक्ट पूर्णत्वास जाणार.

रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाचे नूतनीकरण होत असतानाच वाचनालयाचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलून जाणार आहे. सर्वात जुने पण अद्ययावत वाचनालय म्हणून हे वाचनालय विकसित व्हावे, हे स्वप्न साकार होणार आहे. गेली ३० वर्ष वाचनालय उभे करण्यासाठी ग्रंथसंपदा जतन करत ३० वर्षाचे लीज मंजूर करून घेऊन इमारतीचे काम नव्याने सुरू करण्याची मजल मारताना केलेल्या अथक प्रयत्नानंतर मायदेश फाऊंडेशनचा वरदहस्त प्राप्त झाल्याने आता वाचनालयचा संपूर्ण प्रोजेक्ट विहित मुदतीत पूर्ण होईल. इथली ग्रंथसंपदा पूर्ण सुरक्षित राहील, वाचनालयाची दालने परत एकदा सांस्कृतिक केंद्र म्हणून आपले नाव प्रस्थापित करतील, असे ॲड. दीपक पटवर्धन म्हणाले.

ऑक्टोबर २०२५ मध्ये वाचन विभागाचा शुभारंभ.

  1. मायदेश फाऊंडेशनचे मुख्य प्रवर्तक श्री. अरुण जोशी व त्यांचे काही सहकारी संचालक १० ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या वाचनालयाच्या तळमजल्याच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहतील. वाचनालयाचा अध्यक्ष या नात्याने मी केलेली आग्रही विनंती मान्य करत श्री. अरुण जोशी आणि त्यांचे सहकारी उद्घाटन समारंभाला आवर्जून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाचे अध्यक्ष ॲड. पटवर्धन यांनी दिली.

रत्नागिरी – रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या इमारतीची पुनर्बांधणी सुरू आहे. तळमजल्याचे काम अंतिम टप्प्यात आहे, तर सभागृहाचे काम प्रगतीपथावर आहे. दुसऱ्या मजल्याचे काम बाकी आहे. १२००० चौ. फुटाचा एफ. एस. आय. वापरून दुमजली बांधकामाची परवानगी वाचनालयाला प्राप्त आहे. आजपर्यंत १ कोटी ५० लाखांच्या आसपास काम झाले आहे. मात्र प्रोजेक्ट पूर्ण होण्यासाठी अधिकच्या निधीची आवश्यकता होती. त्यासाठी विविध स्तरावर संपर्क, संवाद सुरू होता. याच प्रक्रियेत पुणे स्थित श्री. अरुण जोशी यांचा संपर्क झाला. त्यांनी वाचनालयाची माहिती घेतली, तपशीलवार चर्चा केली. त्यांनी स्वतः ‘मायदेश फाऊंडेशन’ निर्माण केलय. स्वकष्टार्जित निधी वापरून जुन्या ऐतिहासिक संस्था, कलात्मक तसेच शैक्षणिक, राष्ट्रवादाशी संलग्न विषय या क्षेत्रात मायदेश फाऊंडेशनच्या माध्यमातून सहकार्य करतात, सहभागातून संपूर्ण प्रोजेक्ट विकसित करतात. भारताचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभव टिकून ठेवत त्यात नाविन्य आणणं, नूतनीकरण यासाठी मायदेश फाऊंडेशन समर्पित आहे.

राष्ट्रीय वारसा ठरतील अशा संस्थांसाठी रचनात्मक कार्य.

भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे चे नूतनीकरण, स्वा. सावरकर सेवा केंद्र विलेपार्ले हे नव्या बहुआगामी स्वरूपात मायदेशने विकसित केले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांचे नूतनीकरण, विद्यार्थ्यांसाठी संगणक सुविधा पुरवणे, पेशवेकालीन शंकर महादेव मंदिराचा जीर्णोद्धार इत्यादी महत्त्वाच्या राष्ट्रीय ऐतिहासिक मानल्या जाणाऱ्या प्रोजेक्टवर मायदेशने भरभरून काम करून आज हे सर्व प्रोजेक्ट अद्ययावत स्वरूपात उभे केले आहेत.

मायदेश फाऊंडेशनच्या संचालक मंडळावर अत्यंत प्रथितयश व्यावसायिक असामी असून संपूर्ण संचालक मंडळ इतिहास, कला, शिक्षण या विषयासाठी समर्पित होऊन काम करते . मायदेश फाऊंडेशन बरोबर संपर्क झाला, श्री. अरुण जोशी तसेच संचालक मंडळ सदस्य यांचे बरोबर चर्चा झाली. त्यांनी माहिती घेऊन वाचनालयाच्या पुनर्बांधणीसाठी १ कोटी 50 लाख रक्कम खर्च करण्याचे मान्य केले.

वाचनालयात डिजिटल लायब्ररी मायदेश डिजिटल लायब्ररी नावाने उभी करणे, दुर्मिळ पुस्तकांचे डिजिटलायझेशन, वाचनालयात होणाऱ्या सभागृहाचे संपूर्ण अद्ययावत करने, स्वा. सावरकर कम्युनिटी सेंटर उभारणी, दुसऱ्या मजल्यावर शेड उभारून त्यावर सोलर पॅनल लावून संपूर्ण वाचनालय सोलर पॉवरवर नेणे, वाचनालयात लीफ्ट लावणे, वाचनालयाबाहेरच्या जागेचे सुशोभीकरण करणे इत्यादी रचनात्मक कामे करतानाच वाचनालयाच्या विकासासाठी मार्गदर्शन आणि तांत्रिक सुविधा पुरवण्याचे महत्त्वपूर्ण काम ‘मायदेश फाऊंडेशन’ करणार आहे.

रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाचे नूतनीकरण होत असतानाच वाचनालयाचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलून जाणार आहे. सर्वात जुने पण अद्ययावत वाचनालय म्हणून हे वाचनालय विकसित व्हावे, हे स्वप्न साकार होणार आहे. गेली ३० वर्ष वाचनालय उभे करण्यासाठी ग्रंथसंपदा जतन करत ३० वर्षाचे लीज मंजूर करून घेऊन इमारतीचे काम नव्याने सुरू करण्याची मजल मारताना केलेल्या अथक प्रयत्नानंतर मायदेश फाऊंडेशनचा वरदहस्त प्राप्त झाल्याने आता वाचनालयचा संपूर्ण प्रोजेक्ट विहित मुदतीत पूर्ण होईल. इथली ग्रंथसंपदा पूर्ण सुरक्षित राहील, वाचनालयाची दालने परत एकदा सांस्कृतिक केंद्र म्हणून आपले नाव प्रस्थापित करतील, असे ॲड. दीपक पटवर्धन म्हणाले.

ऑक्टोबर २०२५ मध्ये वाचन विभागाचा शुभारंभ.

मायदेश फाऊंडेशनचे मुख्य प्रवर्तक श्री. अरुण जोशी व त्यांचे काही सहकारी संचालक १० ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या वाचनालयाच्या तळमजल्याच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहतील. वाचनालयाचा अध्यक्ष या नात्याने मी केलेली आग्रही विनंती मान्य करत श्री. अरुण जोशी आणि त्यांचे सहकारी उद्घाटन समारंभाला आवर्जून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाचे अध्यक्ष ॲड. पटवर्धन यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button