मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्त

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग आदर्श शिक्षक पुरस्कार 2025 जाहीर

27 प्रस्तावांमधून 9 शिक्षकांची निवड - सीईओ वैदेही रानडे 

रत्नागिरी : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार 9 शिक्षकांना जाहीर झाला आहे. आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्राप्त 27 प्रस्तावांमध्ये ही निवड करण्यात आली असून, गणेशोत्सवानंतर लवकरच या पुरस्काराचे वितरण केले जाईल, अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

निवड करण्यात आलेले शिक्षक पुढीलप्रमाणे-

मंडणगड जि.प. पू. प्राथमिक मराठी शाळा बामणघर पदवीधर शिक्षक संजय करावडे,

दापोली- जि.प. आदर्श प्राथमिक शाळा वाकवली नं. 1 उपशिक्षक जावेद शेख,

खेड- जि.प. पू. प्राथमिक शाळा सवेणी नं. 1 पदवीधर शिक्षक एकनाथ पाटील,

चिपळूण- पाग मुलांची पदवीधर शिक्षक नरेश मोरे,

गुहागर- जि.प. पू. प्राथमिक आदर्श शाळा जानवळे नं. 1 उपशिक्षक चंद्रकांत बेलेकर,

संगमेश्वर- जि.प. पू. प्राथमिक आदर्श शाळा हातीव नं.1 पदवीधर शिक्षक विनय होडे,

रत्नागिरी- जि.प. पू. प्राथमिक आदर्श शाळा भोके आंबेकरवाडी पदवीधर शिक्षक प्रदीप जाधव,

लांजा- जि.प. पू. प्राथमिक आदर्श शाळा वाकेड नं. 1 उपशिक्षक नितीन शेंडगे,

राजापूर- जि.प. पू. प्राथमिक गोखले कन्या शाळा पदवीधर शिक्षक सुहास काडगे.

या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी शैक्षणिक पात्रता, गोपनीय अहवाल, शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन, पहिली ते आठवीचे वर्ग आहेत अशा शाळेतील शिक्षकांसाठी गुणदान क्रमप्राप्त राहील. जि. प. प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग आहेत अशा शाळेतील शिक्षकांसाठी गुणदान क्रमप्राप्त राहील. शैक्षणिक संशोधन, लेखन व व्याख्यान, नवभारत साक्षरता अभियान/मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा अभियानासाठी केलेले प्रयत्न, वृत्तपत्र अथवा प्रतिथयश नियतकालिकात प्रकाशित पाच लेख, नवोदय विद्यालय प्रवेश,शालेय कामांबाबत वरिष्ठांचे अभिप्राय, शासनाच्या विविध योजना, शैक्षणिक उठाव, ग्रामीण भागातील सेवा कार्य, मागील पाच वर्षात वर्गात शाळेत केलेली पटसंख्येतील वाढ असे निकष आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button