No PUC… No Fuel नियमाची होणार कठोर अंमलबजावणी!

मुंबई : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी “No PUC… No Fuel” या उपक्रमाची राज्यभरात कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. याचा उद्देश म्हणजे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) नसलेल्या वाहनांना इंधन न देणे, जेणेकरून पर्यावरण प्रदूषणावर नियंत्रण ठेवता येईल.ही योजना भविष्यातील पिढीला प्रदूषणमुक्त पर्यावरण देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
या उपक्रमाचे मुख्य मुद्दे:
प्रत्येक पेट्रोल पंपावर वाहन क्रमांक स्कॅन केला जाईल आणि PUC वैध आहे का हे तपासले जाईल.
PUC नसलेल्या वाहनांना इंधन दिले जाणार नाही.
पेट्रोल पंपावरच PUC काढण्याची व्यवस्था केली जाणार आहे, जेणेकरून वाहनचालकांची गैरसोय होणार नाही.
प्रदूषण प्रमाणपत्राला युनिक आयडेंटिटी (UID) दिली जाईल, ज्यामुळे त्याची वैधता वेळोवेळी तपासता येईल.
अवैध PUC प्रमाणपत्र देणाऱ्या टोळ्यांवर कारवाई करण्यासाठी परिवहन विभाग धडक मोहीम राबवणार आहे.