उद्योजक सौरभ मलुष्टे यांच्या माध्यमातून प्रभाग ५ आणि ६ मध्ये मोफत डास निर्मूलन फवारणी

ना. उदय सामंत, आ. किरण सामंत व शिवसेना पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कामाला सुरुवात
रत्नागिरी : सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या सौरभ मलुष्टे यांच्याकडून पुन्हा एक स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक ५ आणि ६ मधील प्रत्येक घरोघरी डास निर्मूलन फवारणी सुरू करण्यात आली आहे. नागरिकांची समस्या लक्षात घेऊन सौरभ मलुष्टे यांनी हे पाऊल उचलले आहे. दररोज होणाऱ्या कामाचा आढावा देखील सौरभ मलुष्टे यांच्याकडून घेण्यात येत आहे.
मुसळधार पावसात अनेक ठिकाणी पाणी साचून डासांची मोठ्या प्रमाणावर पैदास झाली आहे. डासांचा वाढत्या प्रादुर्भावाने ताप आणि डेंग्यू सारखे आजार पसरण्याचा धोका लक्षात घेत प्रभागातील नागरिकांच्या आरोग्याच्या हितासाठी उद्योजक सौरभ मलुष्टे यांनी पालकमंत्री ना. उदय सामंत, आमदार किरण सामंत आणि शिवसेनेचे पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक ५ आणि ६ मध्ये डास फवारणी करण्याचा निर्णय घेत प्रत्यक्ष फवारणीला सुरुवात केली आहे. रत्नागिरी नगर पालिकेकडून डास निर्मूलनासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. नगरपालिकेच्या साथीने आता सौरभ मलुष्टे हे देखील डास निर्मूलनासाठी मैदानात उतरले आहेत.
शहरातील प्रभाग ५ आणि ६ मधून नागरिकांकडून डास निर्मूलन फवारणीसाठी मागणी येताच तत्काळ त्या ठिकाणी भेट देऊन फवारणी केली जात आहे. फवारणीसाठी सौरभ मलुष्टे यांनी स्वतंत्र यंत्रणा उभी केली आहे. याशिवाय प्रत्येक दिवशी प्रभागातील एक भाग निवडून त्या ठिकाणी जाऊन डास निर्मूलन फवारणी केली जात आहे. रत्नागिरी नगरपालिकेसह सौरभ मलुष्टे यांनी प्रभागातील नागरिकांसाठी डास निर्मूलन फवारणी करण्याच्या निर्णयाचा प्रभागातील नागरिकांकडून विशेष कौतुक केले जात आहे. त्यांच्या या उपक्रमाला शिवसेनेतील वरिष्ठ पदाधिकारी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची देखील साथ मिळत आहे. तसेच प्रभाग ५ आणि ६ मधील नागरिकांना कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास नागरिकांनी 7972130853 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सौरभ मलुष्टे यांच्या वतीने करण्यात आले आहे.