Uncategorized

विभागीय कॅरम स्पर्धेत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह १४, १७ व १९ वयोगटांतील विद्यार्थ्यांचे यश

रत्नागिरी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद द्वारा रत्नागिरी येथे विभागीय कॅरम स्पर्धेचे आयोजन २७ आणि २८ ऑक्टोबर रोजी मारुती मंदिर येथील जिल्हा क्रीडा कार्यालयात करण्यात आले होते. या स्पर्धेत आठ जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन १४, १७ आणि १९ वर्षांखालील गटात यश मिळवले. राज्यस्तरीय स्पर्धा येत्या १२ ते १४ नोव्हेंबर रोजी आंबोली सैनिक स्कूल येथे आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धेचे उद्घाटन रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर, महाराष्ट्र राज्य क्रीडा मार्गदर्शक गणेश खैरमोडे, क्रीडा अधिकारी अक्षय मारकड, क्रीडा अधिकारी गणेश जगताप, विभागीय कॅरम स्पर्धेचे प्रमुख पंच मंदार दळवी व सागर कुलकर्णी, स्पर्धाप्रमुख मिलिंद साप्ते आदींच्या प्रमुख उपस्थितीत झाला. सोमवारी घेण्यात आलेल्या विभागीय कॅरम स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलींच्या गटात रत्नागिरी येथील रा.भा. शिर्के विद्यालयची स्वरा मिलिंद कदम, तर मुलांच्या गटात कोल्हापूर माझी शाळा भोसले वाडीचा ओमकार राजू वडर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. आता राज्यस्तरीय स्पर्धा येत्या १२ ते १४ नोव्हेंबर रोजी आंबोली सैनिक स्कूल येथे आयोजित करण्यात आली आहे.

१४ वर्षांखालील मुलींच्या गटात स्वरा मिलिंद कदम (प्रथम), रत्नागिरी रा.भा. शिर्के स्कूलची स्वरा सुरेश मोहिरे (द्वितीय), कळसुलकर इंग्लिश स्कूल सावंतवाडीची साक्षी रमेश रामदूरकर (तिसरी), सातारा वाई येथील जान्हवी बळीराम निशाद (चौथी), रत्नागिरी रा.भा. शिर्के स्कूलची सृष्टी पंकज चवंडे (पाचवी), मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडीची आस्था अभिमन्यू लोंढे (सहावी) यांनी क्रमांक पटकावले.

आंबोली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धेसाठी १७ वर्षांखालील मुलांचा कोल्हापूर विभागाचा संघ.

१४ वर्षांखालील मुलांच्या गटात कोल्हापूरचा ओमकार राजू वडर (प्रथम), जैतापूर न्यू इंग्लिश स्कूलचा सर्वेश गणेश अमरे (द्वितीय), जैतापूर न्यू इंग्लिश स्कूलचा वेदांत राजेश करगुटकर (तृतीय), कोल्हापूर सावित्रीबाई फुले विद्यालयाचा निखिल लक्ष्मण पाटील (चौथा), गुहागर श्रीदेव गोपाळ कृष्ण विद्यालयाचा स्मित राजेंद्र कदम (पाचवा), सिंधुदुर्ग नॅशनल इंग्लिश स्कूल नडगिवेचा आरफात चौगुले (सहावा) यांनी क्रमांक पटकावले.

१७ वर्षांखालील गटात कोल्हापूर विमला गोयंका स्कूलची ईश्वरी धैर्यशील पाटील (प्रथम), देवगड उमा मिलिंद पवार हायस्कूलची पूर्वा दीपक कोतकर (द्वितीय), रत्नागिरी गोदुताई जांभेकर विद्यालयाची सेजल सुभाष जाधव (तृतीय), सिंधुदुर्ग कनेडी माध्यमिक विद्यालयाची श्रेया राजेंद्र महाडिक (चौथी), सातारा न्यू इंग्लिश स्कूल कण्हेरची तनिष्का दिलीप कडव (पाचवी), रत्नागिरी सेक्रेट हार्ट काॅन्व्हेंटची खुशी नरेंद्र आयरे (सहावी) यांनी क्रमांक पटकावला.

१७ वर्षांखालील मुलांच्या गटांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील रा.भा. शिर्के हायस्कूलचा ओम दिनेश पारकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला मीलाग्रीस हायस्कूल, सावंतवाडीचा अमूल्य अरूण घाडी यानी द्वितीय, इम्यानुअल इंग्लिश स्कूल सांगलीचा विद्यार्थी प्रथमेश दिलीप हद्दीमनी यानी तृतीय, साई इंग्लिश स्कूल इचलकरंजीचा विद्यार्थी मोहम्मद अजीम अस्लम शेख यानी चौथा, राणी पार्वतीदेवी हायस्कूल व जुनियर कॉलेज सावंतवाडीचा विद्यार्थी स्वप्निल मंगेश लाखे पाचवा आणि न्यु हायस्कूल कसबा, तारळे कोल्हापूरचा विद्यार्थी वेदांत विजय पाटील यांनी सहावा क्रमांक पटकावला

१९ वर्षांखालील मुलींमध्ये प्रथम क्रमांक राणी पार्वतीदेवी हायस्कूल व जुनियर कॉलेज सावंतवाडीची विद्यार्थीनी प्रणिता नथुराम आयरे, द्वितीय क्रमांक रत्नागिरी अभ्यंकर-कुलकर्णी महाविद्यालयाची श्रावणी विजय कोलगे, तृतीय क्रमांक सातारा श्री भवानी विद्यामंदिरची श्रावणी रमेश साबळे, चौथी रत्नागिरी अभ्यंकर-कुलकर्णी विद्यालयाची मुक्ता अविनाश पेंडसे, पाचवी रत्नागिरी अभ्यंकर कुलकर्णी महाविद्यालयाची समीरा सचिन शिंदे, सहावी सांगली इस्लामपूर सुशाताई पाटील स्कूलची दीपाली कैलास माळी यांनी पटकावला आहे.

तर १९ वर्षांखालील मुलांमध्ये प्रथम क्रमांक सावंतवाडी मिलाग्रिस हायस्कूल विद्यालयाचा राम प्रकाश फाले, द्वितीय क्रमांक सांगली शिराळा श्री शिव छत्रपती विद्यालयाचा संस्कार सुनील कांबळे, तृतीय क्रमांक सातारा मालोजीराजे शेती विद्यालयाचा ओंकार रामचंद्र रामदास शिंदे, चौथा क्रमांक सांगली शिराळा न्यू इंग्लिश स्कूलचा आजान समीर मुजावर, पाचवा क्रमांक सिंधुदुर्ग कासार्डे माध्यमिक विद्यालयाचा वेदांत विनायक वायंगणकर, सहावा क्रमांक सांगली श्रीमती कस्तुरबाई वालचंद कॉलेजचा अभिषेक सुनील केंचे यांनी क्रमांक पटकावला.

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर, महाराष्ट्र राज्य क्रीडा मार्गदर्शक गणेश खैरमोडे, क्रीडा अधिकारी अक्षय मारकड, क्रीडा अधिकारी गणेश जगताप, विभागीय कॅरम स्पर्धेचे प्रमुख पंच मंदार दळवी व सागर कुलकर्णी, स्पर्धाप्रमुख मिलिंद साप्ते यांनी विशेष परिश्रम घेतले. आठ जिल्ह्यांतून आलेले सर्व क्रीडा प्रशिक्षक, शिक्षक व पालक यांच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा यशस्वी पार पडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button