मुख्य बातमीसाहित्य-कला
“कोकण दिनांक”चा दिवाळी अंक वाचकांच्या भेटीसाठी उपलब्ध
मान्यवर लेखकांच्या, कवींच्या दर्जेदार लेखांचा, कथांचा आणि कवितांचा समावेश

रत्नागिरी : साप्ताहिक “कोंकण दिनांक”चा दिवाळी अंक वाचकांच्या भेटीला उपलब्ध झाला आहे. हे या अंकाचे सलग २७ वे वर्ष आहे.

या अंकात कोकणातील कातळशिल्प अभ्यासक सतीश लळीत, रत्नागिरीतील ज्येष्ठ साहित्यिक अनिल दांडेकर, कोकण अभ्यासक ॲड. विलास पाटणे, आंबा व्यावसायिक आनंद देसाई, पक्षी निरीक्षक तेजा मुळ्ये, प्रा. प्रकाश नाईक यांच्या लेखांचा, कथांचा सामावेश आहे. तसेच संपादक अभिजीत हेगशेट्ये यांचा कोकण रेल्वेच्या अभियंत्यांचा गौरव करणारा चिनाब नदीवरील पुलाचा विषेश लेख यात प्रसिद्ध करण्यात आला आहे.
दिवाळी अंकाची पीडीएफ फाईल सोबत जोडत आहोत :



