रत्नागिरीत २८ डिसेंबरपासून जिल्हास्तरीय खुल्या तायक्वांदो स्पर्धा

रत्नागिरी : रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या मान्यतेने युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटर यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय खुल्या तायक्वांदो स्पर्धा २८ ते ३० डिसेंबर या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममधील जिल्हा क्रीडा संकुलांच्य बॅडमिंटन हॉल येथे आयोजित करण्यात आले आहेत.
या स्पर्धेत जिल्हाभरातून सुमारे ६०० खेळाडू सहभागी होणार आहेत. स्पर्धा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी युवा मार्शल तायक्वांदो ट्रेनिंग सेंटरचे पदाधिकारी प्रशिक्षक आणि पालकांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.
रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या सहकार्याने ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यातील सर्व खेळाडू, प्रशिक्षकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटरच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केली आहे.



