मुख्य बातमीशैक्षणिक

एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात “इंट्रोडक्शन ऑफ बँकिंग ट्रांजेक्शन” ॲक्टिव्हिटी

रत्नागिरी : येथील नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातर्फे “इंट्रोडक्शन ऑफ बँकिंग ट्रांजेक्शन” या बँकिंग ॲक्टिव्हिटीचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.

यामध्ये बँकेत चालणारे दैनंदिन कामकाजाची प्रात्यक्षिकाद्वारे ओळख करून देण्यात आली. यासाठी वर्गात छोटेखाने बँकेचा सेट उभारण्यात आला होता. त्यामध्ये विविध काउंटरचा समावेश करण्यात आला होता. कोणत्या काउंटरवर काय काम चालते याची माहिती यावेळी वाणिज्य शाखेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी करून दिली. बँकेत पैसे जमा करणे, खात्यातून पैसे काढणे या दैनंदिन कामांबरोबरच एटीएम पिन जनरेट करणे, वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज वितरण, म्युच्युअल फंड्स, एनईएफटी, आरटीजीएस, लॉकर सुविधा आधी कामांविषयी प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली.

यावेळी फ्रॉड कॉल अथवा फ्रॉड मेसेजद्वारे विचारल्या जाणाऱ्या एटीएम कोड अथवा बँक खात्याची माहिती शेअर न करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. कोणतीही बँक अशा प्रकारची माहिती मागवत नसून फसव्या आणि खोटारड्या मेसेज किंवा फोनपासून सावध राहण्याचे आवाहन यावेळी सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केले.

यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, नवनिर्माण शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंदार गीते त्यांच्यासह अकरावी बारावी वाणिज्य शाखेत शिकणारे विद्यार्थी उपस्थित होते. या सादरीकरणासाठी वाणिज्य विभागाच्या वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्रा. तन्वी सुर्वे, प्रा. तेजस्विनी पवार, प्रा. अन्विता देवळेकर, प्रा. मैथिली पिलणकर, प्रा. तन्वी कांबळे, प्रणिता पिलणकर, प्रा. निशिता पिलणकर, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रा. दीपाली तावडे यांनी विशेष मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button