मुख्य बातमी

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक “बेस्ट इनोव्हेटीव्ह बँक ऑफ द इयर” या पुरस्काराने सन्मानित

रत्नागिरी : भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ, दिल्ली यांचेमार्फत देशातील राज्य सहकारी बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसाठी “इनजिनिअस लिडरशिप समिट आणि आयकॉनिक लिडर्स २०२४” अंतर्गत बँकेला सन २०२४ चे “बेस्ट इनोव्हेटीव्ह बँक ऑफ द इयर” या पुरस्काराने सन्मानित केले आहे.

हा पुरस्कार वितरण सोहळा वर्सा, गोवा येथे नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. “बेस्ट इनोव्हेटीव्ह बँक ऑफ द इयर” हा पुरस्कार भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ, दिल्लीचे अध्यक्ष दिलीप संघवी यांच्या हस्ते व गोवा राज्याचे सहकार मंत्री सुभाष देसाई, विधानसभा सभापती रमेश तवडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बँकेचे संचालक म. शं. टिळेकर, ग. क. पाटील, रा. ग. गराटे, म. र. खामकर, तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय चव्हाण व सरव्यवस्थापक श्रीकृष्ण खेडेकर यांनी बँकेतर्फे स्विकारला. या पुरस्कार वितरण सोहळ्याला देशातील राज्य सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तसेच सहकार क्षेत्रातील, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी उपस्थित होते. त्यांनी बँकिंग क्षेत्रातील डिजिटल परिवर्तन, सशक्तीकरण, सायबर सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन केले.

बँकेला आजपर्यंत महाराष्ट्र शासन व सहकार क्षेत्रातील नामांकीत संस्थामार्फत विविध १८ पुरस्कार प्राप्त झाले असून भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ दिल्ली, यांचेमार्फत १९वा पुरस्कार प्राप्त झाला आहे. ३१ मार्च २०२४ अखेर बँकेच्या ठेवी रु. २६३६.१७ कोटी, कर्जे रु. २००४.३० कोटी, बँकेचा नक्त नफा रु. ३०.१३ कोटी झाल्यामुळे व ग्राहकांसाठी विविध डिजिटल सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे, बँकेचे अध्यक्ष, कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या उत्कृष्ट, शिस्तबद्ध कार्यनियोजन व मार्गदर्शन यामुळे तसेच बँकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव, सर्व संचालक मंडळ सदस्य, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चव्हाण व बँकेचे सर्व अधिकारी कर्मचारी यांचे बँकेच्या कामकाजातील योगदान यामुळे बँकेला प्राप्त झाला असून, राजकीय, बँकिंग व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांकडून बँकेचे अभिनंदन केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button