रत्नागिरी जिल्हा वृत्तशैक्षणिक

स्वतःमध्ये कौशल्य निर्माण करून स्वतःला सिध्द करणे आवश्यक – नवनिर्माण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये

संगमेश्वर : पदवी घेत असताना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची तयारी करणे आवश्यक आहे. आर्टिफिशियल एजन्सी ऍडॉप्ट करून वापरण्याचे कौशल्य संपादन करा असे प्रतिपादन अभिजित हेगशेट्ये यांनी

नवनिर्माण महाविद्यालय आयोजित पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभात केले.

ते म्हणाले की अस्तित्वाची भीती वाटत असल्याने पदवी झालेला विद्यार्थी मुंबईकडे नोकरीसाठी जात आहे.

आयुष्यात रिस्क घेण्याची तयारी असली पाहिजे पदवी पूर्ण झाल्यानंतर मला काही गोष्टी जमत नाहीत म्हणून निराश होण्याचे गरज नसते तर मी काय करू शकतो यासाठी नवीन कल्पना निर्माण करून स्वतःला सिद्ध करण्याची गरज आहे. पदवी घेऊन बाहेर पडत असताना पदवीचे ज्ञान घेऊन मी बाहेर पडलो का याचा विचार करण्याची आवश्यक आहे असे ते म्हणाले.

यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सेक्रेटरी आणि आर्किटेक परेश पाडगावकर, प्राचार्या संजना चव्हाण, प्राचार्या प्रज्ञा कदम आदी मान्यवर उपस्थित होते

महाविद्यालयातील कला वाणिज्य आणि सायन्स मधील विद्यार्थ्यांना परेश पाडगावकर, चेअरमन अभिजित हेगशेट्ये यांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष खरे आणि आभार अनिल नेमन यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button