मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्त

राजापुरातील दोन विनापरवाना कातकभट्टया वनिभागाकडून सील

राजापूर : कातभट्टी व्यवसायाबाबत शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा वनविभागाच्या आदेशानुसार राजापूर वनविभागाच्या वतीने राजापूर तालुक्यातील दोन विनापरवाना कातभट्टया सील करण्यात आल्याची माहिती राजापूर वनविभागाच्या वतीने देण्यात आली.

कातभट्टी व कात उद्योगाबाबत शासनाने पर्यावरणाला धोका होऊ नये यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कातभट्टी व्यावसायिकांवर कठोर निर्बंध आणले आहेत. जिल्हा वनविभागाच्या वतीने सर्वच कातभट्टया बंद करण्यात आल्या आहेत. राजापूर तालुक्यातही जिल्हा वनविभागाच्या आदेशानुसार दोन कातभट्टया नुकत्याच सील करण्यात आल्या आहेत.

राजापूर तालुक्यात एकूण चार कातभट्टया होत्या. यापैकी दोन कातभट्टया या गेली काही वर्षे बंद आहेत. तर शहरानजीक उन्हाळे येथे पन्हळेकर हर्बल प्रॉक्डक्ट व मठखुर्द येथे परब कातउद्योग समूह अशा दोन कातभट्टया सुरू होत्या.

राजापूर वनविभागाच्या वतीने यापूर्वी जिल्हा वनविभागाच्या आदेशानुसार ऑक्टोबर २०२४ मध्ये या दोन्ही कातभारतीयांवर छापा टाकून सुमारे १४४० किलो इतके कातद्रव्य जप्त करण्यात आले होते व विनापरवाना कातभट्टी चालविल्याप्रकरणी या दोन्ही कातउद्योगाच्या मालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे वनविभागाने सांगितले.

त्यानंतर आता वनविभागाने जिल्हा वनविभागाच्या आदेशानुसार या दोन्ही कातभट्ट्यांवर जाऊन प्रत्यक्ष पहाणी करून संबधित मालकांच्या समक्ष या दोन्ही कातभट्टया सील केल्याची माहिती वनिभागाने दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button