मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्तशैक्षणिक

जि.प. शाळा पिरंदवणे येथे शिवजयंती जल्लोषात

विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून सांगितली छत्रपती शिवरायांची महती

संगमेश्वर : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा पिरंदवणे नं. १ येथे हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची ३९५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेचे उपशिक्षक कुलदीप देशमुख यांनी पुष्पमाला अर्पण करून शिवछत्रपतींच्या प्रतिमेस अभिवादन केले.

विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. छत्रपती शिवरायांचे शासन कल्याणकारी आणि रयतेला सुखकारक वाटणारे होते. शिवरायांनी जिजाऊ माँसाहेब आणि वडील शहाजीराजे भोसले यांचे राज्य स्थापन करण्यासाठी अठरापगड जातींमध्ये ऐक्य घडवून आणून त्यांना स्वराज्याचे महत्त्व पटवून दिले. सुराज्याचे दिव्य स्वप्न पहायला शिकवले आणि त्यानंतर ते साकारण्यासाठी मावळ्यांच्या पिढ्या घडवल्या. स्वतः आघाडीवर राहून त्यांनी मावळ्यांना प्रेरणा दिली. हीच प्रेरणा आज ३९५ वर्षानंतरही महाराजांच्या जीवनचरित्रातून आपण घ्यायची आहे, असे मनोगत पदवीधर शिक्षक योगेश मुळे यांनी व्यक्त केले.

यानंतर विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रभातफेरी काढली. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणांनी आसमंत निनादला. कार्यक्रमासाठी अंगणवाडी ताई श्रीमती रंजन जांभळे, सेविका विद्या धोपट, विद्यार्थी व शाळेतील शिक्षकवृंद उपस्थित होते. इयत्ता पाचवीतील विघ्नेश गुरव याने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. उपशिक्षक सचिन इंगळे यांनी आभारप्रदर्शन करून कार्यक्रमाचा समारोप केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button